चहा का विकला जात नाही ? चला जाणून घेऊया खरे कारण | tea ban for sale in sindhudurg district's
Matond tea ban for sale in sindhudurg #tea #teatime # |
महाराष्ट्रात असेही गाव आहे जिथे चहा विकला जात नाही. कोकणातील एखादा उत्सव असो किंवा कार्यक्रम अथवा गावातील जत्रा त्यात चहाचा स्टॉल किंवा हॉटेल तुम्हाला दिसणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातोंड गावात कधीच चहा विकला जात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील ‘मातोंड’ या गावात कधीच चहा विकला जात नाही. गावातच नव्हे, तर गावाबाहेरही मातोंडमधील व्यक्ती चहाचा स्टॉल घालून चहा विकणार नाही. शेकडो वर्षांची ती परंपरा अनेक पिढ्यांनंतर आजही कायम आहे. ग्रामस्थांपैकी कोणालाही जर कोणता व्यवसाय करावा लागला, तर ते चहाविक्री सोडून अन्य कोणताही व्यवसाय करतात. गावात येणाऱ्या पाहुण्यांना घरी नेऊन चहा दिला जातो. अनेक वर्षांची ती परंपरा आजही मातोंड गावात सुरू आहे.
मातोंड हे सावंतवाडी आणि वेंगुर्ले सीमेवरचे तळवडेलगतचे गाव. गावात सगळेजण अगदी गुण्यागोविंदाने राहतात. या गावातील अनेक व्यक्ती उच्च पदावर आहेत. गावात अनेक मंदिरे, प्राथमिक, माध्यमिक शाळा आहे. गावात सुशिक्षित कुटुंबे सर्वाधिक आहेत. या गावात तुम्ही कधीही या तुमचे हसतमुखाने स्वागत होईल, पण गावात येऊन जर तुम्हाला चहा पिण्याची लहर आली तर मात्र तो मिळणं शक्यच नाही. कारण इथं चहाचा एकही स्टॉल नाही.
महाराष्ट्रातील चहा विक्रीस बंदी असलेलं गाव
कोकणात पारध करण्याची फार जुनी परंपरा आहे तशी ती मातोंड गावातही आहे. अवसारी देवाच्या किंवा कौल प्रसादाच्या सुचनेनुसार गावातील मानकरी जंगलात पारधीसाठी जायचे. पारध करुन रानडुक्कर आणला जायचा. त्यानंतर येथील सातेरी मंदिरासमोर देवाचा मोठा मंडप उभारुन उत्सव साजरा होत असे.
एका वर्षी देवाचा मंडप उभारण्याआधीच गावातील एका व्यक्तीने चहाचा स्टॉल उभारुन मंडपही उभारला. इकडे मानकऱ्यांना सगळं जंगल पालथं घालूनही शिकार सापडेना. त्यावेळी असे लक्षात आले, की देवाचा मंडप उभारण्याआधीच चहाचा स्टॉल सुरू केला म्हणूनच अडचणी येत आहेत. तो मंडप आणि चहाचा स्टॉल तत्काळ हटवण्यात आला. त्याच दिवशी जंगलात शिकार मिळाली. त्या दिवसापासून गावात चहा विकणे बंद झाले.
दुसऱ्या दंतकथेनुसार, गावात आलेल्या नेहमीच्या एका पाहुण्यांना मालकाने पूर्वीचे तीन आणि आजचे दोन कप चहा असा हिशोब सांगितला. त्यावरुन चिडलेल्या इसमाने पाहुण्यांना चहाचा हिशोब सांगून त्यांच्यासमोर आपली बेअब्रु केली असे समजून गावपंचांकडे तक्रार केली. तेव्हापासून पंचायतीच्या निर्णयानुसार गावात सर्वांनाच चहा विक्रीला सक्तीची बंदी करण्यात आली.
Matond village is in Matond taluka of Sindhudurg district in state of Maharashtra. Matond village distance from district place Sindhudurg is about 44 Km. Matond village distance from taluka place Vengurla is about 24 Km. Matond village area is 1250.00 hector. According to 2011 census population of Matond village is 2852. About 710 families lives in Matond village. Total male population is 1404 and female population is 1448. Matond village has a sub post office. Pincode of village Matond is 416529. Public state transport services are available in village Matond. Matond does not have railway station. Matond is on the national highway. Matond is not on the state highway. Matond is not on the district road. Matond does not have commercial/nationalise banks. Matond does not have co-operative banks. Matond has agriculture credit societies. Matond does not have agriculture credit societies. Matond has self help groups. Matond does not have daily market. Matond does not have weekly market. Matond does not have public library. Matond has newspaper services.
#tea #teatime #coffee #tealover #tealovers #chai #love #greentea #food #teaaddict #foodie #blacktea #cafe #instagood #healthy #tealife #organic #foodporn #teacup #breakfast #chailover #instatea #photography #autismo #instagram #healthylifestyle #herbaltea #art #tealove #t