कारंजा (घाडगे) उमेश तिवारी:
मनुविद्या सामाजिक संस्था कारंजा द्वारा संचालित स्वामी विवेकानंद रक्तसंकलन समिती व जिओलाइफ ॲग्री टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजामाता यांच्या जयंती निमित्त रक्त दान शिबिराच्या आयोजन सनशाईन स्कूल कारंजा येथे करण्यात आलेले होते. संकलन समितीच्या वतीने आयोजित हे विसावे वर्ष असून यामध्ये 72 रक्तदात्यांनी ज्यात पाच महिला व 67 पुरुषांनी रक्तदान केले.
याप्रसंगी राष्ट्रमाता जिजामाता स्वामी विवेकानंद यांची प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी नगरपंचायत अध्यक्ष स्वातीताई भिलकर, उपाध्यक्ष भगवान बोवाडे, नगरसेवक कमलेश कठाणे, हेमंत बनगरे, भाजपा शहराध्यक्ष दिलीप जसूतकर, जिओ लाइफ ॲग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई टेरिटोरी मॅनेजर रोशन इंगळे, डॉ. हेडगेवार रक्तपेढी,नागपूर चे प्रवीण पाटील व त्यांची चमू उपस्थित होती. या रक्तदान शिबिरामध्ये सौ. जाव्हवी मोटवाणी , डॉ. मृणाल टूले, सौं.ममता दिवाने, सौ मीनाक्षी सावरकर व सुप्रिया लोहारकर या पाच महिलांनी रक्तदान करून भविष्यात महिलांनी रक्तदान करण्यासंदर्भात आव्हान केले तसेच राम मोटवानी व सौ. जान्हवी मोटवानी या दाम्पत्याने व संजय अग्रवाल व अमन अग्रवाल या पितापुत्र ने सोबत केले. प्रामुख्याने 21 वर्षीय आकाश मोहन डोबले या अंध युवकाने रक्तदान केले.,
या शिबिराप्रसंगी बोलताना आयोजक प्रेम महिले यांनी आपल्या शहरांमध्ये सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे तरुणांना आवाहन केले तसेच गरजू रुग्णांना तात्काळ रक्त मिळावे याकरिता आपण कधीही संपर्क साधल्यास मी तत्पर राहील असे आश्वासित केले तसेच मागील वीस वर्षापासून स्वामी विवेकानंद रक्त संकलन समिती कारंजाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती निमित्त आपण रक्तदान घेतोच तसेच आपल्या तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांना डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी नागपूरच्या माध्यमातून तात्काळ रक्त उपलब्ध करून देण्यात आलेले आहे/
याबाबत माहिती दिली तसेच अनेक महिला या रक्तदान करण्यास इच्छुक असूनही रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे बरेचदा त्यांना रक्तदान न करता परत जावे लागते त्यामुळे अनेक महिला रक्तदानापासून वंचित असतात त्यांच्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला तसेच जिओलाइफ ॲग्री टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई चे सर्व संचालक तथा रेंज मॅनेजर दिलीप देवीदी यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सनशाईन स्कूल कारंजाचे विद्यार्थ्यांनी रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्यात मोलाचे कार्य केले. यशस्वीतेसाठी सनशाईन स्कूल कारंजाचे पर्यवेक्षक पवन ठाकरे, हेमंत बन्नगरे, मंगेश भगत, सर्व शिक्षिका वृंद यांनी परिश्रम केले.