Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी १४, २०२३

'चंद्रपूर प्रीमियर लीग' स्पर्धेची उत्साही सुरूवात' CHANDRAPUR PREMIER LEAGUE

चंद्रपुरात क्रीडा अकादमी स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करू- जिल्हाधिकारी विनय गौडा

सिपीएलच्या इतिहासात प्रथमच उद्घाटनाच्या सामन्यात सुपर ओव्हरने झाला विजयाचा फैसला



चंद्रपूर प्रीमियर लीग CPL टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज उत्साही प्रारंभ झाला. शहरातील लाईफ फाउंडेशन च्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे नववे पर्व आहे. गुरुवारी सकाळी या क्रिकेट कार्निव्हलचा प्रारंभ जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, विभागीय वनाधिकारी श्री. प्रशांत खाडे, सेंट मायकेल शाळेचे प्राचार्य श्री.विकास कोल्हेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत लाईफ फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. सेंट मायकेल शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना मैदानात बोट धरून आणले तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा एकच गजर केला. जिल्हाधिकारी गौडा यांच्या हस्ते पीच पूजा करून नारळ फोडण्यात आला. 
चंद्रपूर

CHANDRAPUR PREMIER LEAGUE -Season 5


मान्यवरांच्या उपस्थितीत नाणेफेक करण्यात आली. खेळभावनेचा जयजयकार करणारे फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले. आपल्या शुभेच्छापर संबोधनातून स्पर्धा आयोजकांनी जिल्ह्यात क्रीडा अकादमी स्थापन करण्याचा मागणीचा पाठपुरावा करण्याची महत्वपूर्ण घोषणा जिल्हाधिकारी गौडा यांनी केली. विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे आणि प्राचार्य विकास कोल्हेकर यांनी आपले समयोचित मार्गदर्शन केले. 

पहिला सामना 'व्हाईट एश विरुद्ध डायनॅमिक फायटर्स' यांच्यात खेळला गेला. डायनॅमिक फायटर्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. व्हाइट ऐश ने संघाने फलंदाजी करताना 20 ओव्हर्स मध्ये 125 धावा केल्या. दुसऱ्या डावात डायनॅमिक फायटर्स संघाने देखील 20 ओव्हर्समध्ये 125 धावा केल्या.दोन्ही संघांनी समान धावा केल्या. त्यामुळे नियमानुसार सुपर ओवर झाला. यात डायनॅमिक संघानें 2 धावा काढल्या.

उत्तरादाखल व्हाईट ऐशने 3 धावा काढून प्रथम सामना खिशात घातला. यानंतर उद्यापासून दररोज 2 लीग सामने खेळविले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार 29 जानेवारी रोजी खेळविला जाणार आहे. विजेत्या संघाला १ लाख २१ हजार रु. व लखलखती ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धेच्या यशासाठी लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष संजय तुमराम, उपाध्यक्ष आरीफ खान, नाहीद सिद्दीकी ,सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, सदस्य शैलेंद्र भोयर, डॉ. किशोर भट्टाचार्य, रईस काजी, आर्किटेक्ट वसीम शेख, कमल जोरा, प्रकाश सुर्वे,आशीष अम्बाडे कार्यरत आहेत.

Welcome to CHANDRAPUR PREMIER LEAGUE -Season 5 Checkout this space for latest news and updates from CHANDRAPUR PREMIER LEAGUE -Season 5 Powered by CricClubs - Manage Your Cricket league for FREE with Live Scoring. For more information on CricClubs please visit CricClubs.com.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.