Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर ०७, २०२२

आता या भूगर्भातही सोने खनिजसाठा असल्याचे सिद्ध ! हे ठिकाण आहे तरी कुठे? Gold Mine




#नागपूर । चंद्रपूर, भंडारा नंतर आता नागपूर जिल्ह्यातील भूगर्भात #सोने_खनिजसाठा असल्याचे सिद्ध झाले असून या संदर्भात नागपुरातील #भारतीय_भूवैज्ञानिक_सर्वेक्षण विभागाने केंद्र आणि राज्य सरकारला आपला विस्तृत अहवाल दिला आहे. #नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरुपार या गावांच्या खाली गोल्ड ओर असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती #भूगर्भ_सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि एमईसीएल (पूर्वी मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड) यांनी जवळपास 36 ब्लॉक्सचा शोध घेतला आहे. हे ब्लॉक्स योग्य प्रक्रियेनंतर लिलावासाठी टाकले जातील. योग्य धोरणात्मक उपायांसह, आम्ही आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी खनिज क्षमतेचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर यांसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये खनिज साठे आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून संशोधन केले जात आहे. खाणकाम व्यवहार्य आणि उत्पादनक्षम बनवण्यासाठी, राज्य सरकारने संयुक्त खाण परवान्याची क्षेत्र मर्यादा २५ वरून १०० चौरस किमीपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आधीच तयार केला आहे.

देशात सर्वाधिक सोन्याचा साथ कोणत्या राज्यात आहे, असा प्रश्न तुमच्या मनातही आला असेल. ज्या राज्यात सर्वाधिक सोने असेल तेच राज्य सर्वात श्रीमंत असेल, असेही तुम्ही गृहीत धरत असाल. मात्र असं नाही आहे. अलीकडेच जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (GSI) गोल्ड रिझव्‍‌र्ह (Gold Reserve) संदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात असे आढळून आले की, देशातील एकूण सोन्यापैकी 44 टक्के सोने फक्त बिहारमध्ये आहे. हे प्रमाण 222.8 दशलक्ष टन किंवा 2230 लाख टन इतके असू शकते. आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे बिहारच्या जमुई जिल्ह्यात सर्वाधिक 27.6 टन सोन्याचा साठा आहे. एका आकडेवारीनुसार, देशात 500 दशलक्ष टन (सुमारे 5000 लाख टन) सोन्याचा साठा आहे, त्यापैकी 44% बिहारमध्ये आहे.
x
 maharashtraGold Mine in MaharashtraKonkanvidarbhaGold mine found in Konkan and VidarbhaUnderground Mineralmarathi newsNews in Marathi.

 #GoldMine #IndiaGoldMine #RealGoldMine
Gold-silver prices

- भारतात सोन्याच्या ज्या खाणी आहेत त्यापैकी सर्वात मोठी खाण ही कर्नाटक राज्यातील कोलार ही खाण आहे.

Big gold mine found India। भारतात सापडली सोन्याची मोठी खाण, कुठे आहे ही खाण? लगेच जाणून घ्या

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.