Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १३, २०२२

Maharashtra Assembly | नागपूर हिवाळी अधिवेशन | सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार |

Khabarbat News

 राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून नागपूरात सुरु

Maharashtra Assembly Winter Session Will Be In Nagpur On 19 December 2022 

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. येत्या ३० तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा कार्यक्रम आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला. या अधिवेशनात अंदाजे २१ विधेयकं सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. एकूणच दोन्ही सभागृहातील कामकाजासदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. या अधिवेशनात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार आहेत. तसंच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं विशेष कार्यक्रम राबवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. 

CM Eknath Shinde 

 | Hiwali Adhiveshan

नागपूर- विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, तसंच आपली उपेक्षा होत असल्याची विदर्भ वासियांची भावना दूर करण्यासाठी हे अधिवेशन किमान ३ आठवड्यांचं घ्यावं, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या बैठकीत केली. कोरोनामुळे गेली २ वर्ष नागपूरला अधिवेशन झालं नव्हतं त्यामुळे सरकारनं जास्त कालावधीचं आधिवेशन घेतलं पाहिजे असं, ते म्हणाले. याबाबत अधिवेशन काळात नागपूर मधे २८ डिसेबरला होणाऱ्या पुढच्या बैठकीत निर्णय घ्यायचं मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मान्य केलं.

नागपूर हिवाळी अधिवेशन | सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार  |  Big Breaking | CM Eknath Shinde 



राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या सोमवारी १६ तारखेपासून नागपूर इथं प्रारंभ होणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनातल्या प्रस्तावित कामकाजावर चर्चा झाली.

अधिवेशनात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयकं, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे. सात अशासकीय विधेयकांवरही अधिवेशनात चर्चा होईल. 
 Hiwali Adhiveshan  Big Breaking | CM Eknath Shinde 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.