वाघाच्या हल्ल्यात इसम ठार
ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना
वाघाच्या हल्ल्यात दोन दिवसात दोन ठार
शहर प्रतिनिधी ब्रम्हपुरी :- तालुक्यातील तोरगाव ( बुजुर्ग) येथे दोन दिवसापूर्वी शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज तिसऱ्या दिवशी वाघाने लाखापूर येथील जंगल परिसरात इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.जगन पानसे राह. लाखापुर असे मृतक इसमाचे नाव आहे.
मृतक इसम जगन पानसे हे काल दिनांक चार नोव्हेंबरला काड्या तोडण्याकरिता जंगलात गेले होते मात्र रात्र होऊनही ते घरी परतले नव्हते. आज जंगलामध्ये त्यांचा शोध घेतला असता मृतदेह आढळून आला . वाघाच्या हल्ल्यात सदर इसम ठार झाल्याचे निष्पन्न झाले असून घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली गावकऱ्यांनी केली आहे आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नरभक्षक वाघाला पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.