यंदाच्या दिवाळीला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पुढील दिवशी सूर्यग्रहणाचा खगोलीय आविष्कार अनुभवण्याची संधी खगोलप्रेमींना उपलब्ध झाली. यावर्षीचे अखेरचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला अनुभवायला मिळाले. तब्बल सत्तावीस वर्षांनंतर दिवाळी सणाच्या दिवसांत ग्रहणाचा हा योग आला आहे. चंद्रपूर येथे स्काय वॉच ग्रुपच्या वतीने सूर्यग्रहणाची ही अनुभूती घेता आली. डॉ. पंजाबराव देशमुख हायस्कूल मध्ये स्काय वॉच गृप,जनता महाविद्यालय आणि मराठी विज्ञान परिषद च्या माध्यमातून शिबीर घेण्यात आला.
खंडग्रास सूर्यग्रहण मंगळवारी होते. ग्रहण थेट डोळ्यांनी पाहणे अयोग्य असल्याने स्काय वॉच ग्रुपच्या वतीने येथे ग्रहण पाहण्यासाठी खास शिबीर घेण्यात आले. ०यात शहरातील नागरिक आणि शालेय विद्यार्थांनी खंडग्रास सूर्यगहण पाहण्याचा आनंद घेतला.
सायंकाळी ४ वाजून ४२ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झाला. ग्रहण सुरू होताच हळूहळू सूर्यबिंबाची तेजस्विता कमी झाली. ३६ टक्के सूर्याचा भाग झाकोळला गेला. त्यामुळे नेहमीएवढा सूर्याचा प्रकाश जाणवला नाही. दिवसा काही प्रमाणात अंधार जाणवत होता. ग्रहण पाहण्यासाठी खास टेलिस्कोपीची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी खास फिल्टर लावून फोटो घेतले. 5.38 वाजता ग्राहनातच सूर्यास्त झाला.
ग्रहण काळात काही खाऊ नये, पिऊ नये, असे सांगितले जाते. मात्र, हि अंधश्रद्धा दूर सारून चांगलीच गर्दी होती. त्यामुळे ग्रहणाविषयी तर्क फोल असून वैज्ञानिक दृष्ट्या ग्रहण पाहण्यासाठी माहिती घेण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती, असे प्रा. योगेश दुधपचारे यांनी सांगितले. डोळ्यांनी थेट पाहणे अयोग्य असल्याने ग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था प्रा. सुरेश चोपणे यकेली होती. खगोल अभ्यास ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.
शिबिरात शाळेचे विध्यार्थी, नागरिक आणि पत्रकार मंडळी नि सहभाग घेवून सूर्यग्रहण निरीक्षण केले.शिबिरात स्काय वाच गृप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यांनी मार्गदर्शन केले. प्रा योगेश दुधपचारे ह्यानी विध्यार्त्याना अंधश्रद्धा बाळगू नये ह्यावर मार्गदर्शन केले. स्थानिक शाळेचे शिक्षक व ग्रुपचे सदस्य महेंद्र राळे ह्यांनी शिबिरासाठी व्यवस्था केली होती.
Experience of solar eclipse taken by Sky Watch Group at Chandrapur