दारूच्या नशेत आईला मारहाण करीत असताना भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र वडीलाने पत्नीवर केबल कापणारा कटर उगारला. यात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलीचा गळा कापला. 31 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गडचांदूर येथील विद्यानगर (Vidyanagar in Gadchandur) येथे हि घटना घडली. 44 वर्षीय गुलाबराव लक्ष्मण कानझोडे याना अटक करण्यात आली आहे.
beating drunk
दारूच्या नशेत पत्नीसोबत भांडण करीत होते. ते बघून त्या मुलीने दोघांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या गळ्यावर कटर लागताच ती खाली कोसळली रक्तबंबाळ अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची तक्रार गडचांदूर पोलिसांना माहिती मिळताच आरोपी गुलाबराव कानझोडे ला अटक करून ताब्यात घेतले. मुलीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असून, सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे
Chandrapur police News34 Chandrapur MH34 Pinecode