Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०१, २०२२

खुल्या कोळसा खाणीत उडी घेऊन आत्महत्या |

खुल्या कोळसा खाणीत उडी घेऊन आत्महत्या


चंद्रपूर - वेकोलीच्या लालपेठ खुल्या खाणीत open coal mine lalpeth एका युवकाने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 31 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली. माहिती कळताच वेकोलीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनातील बचाव पथकाने धाव घेतली. शोधकार्य सुरु केल्यावर एका युवकाचा मृतदेह आढळला. यश साखरकर (yash Sakharkar) असे तरुणाचे नाव असून, तो विठ्ठल मंदिर वार्ड येथील रहिवासी आहे. 

Suicide by jumping into an open coal mine lalpeth

वेकोलीच्या लालपेठ खाण क्षेत्र हे प्रतिबंधित आहे. वेकोली कर्मचाऱ्याशिवाय त्याठिकाणी कुणीही प्रवेश करू शकत नाही. तरी तो नजर चुकवीत प्रतिबंधित क्षेत्रात पोहचला. साचलेल्या पाण्यात उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या मागील कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.  Chandrapur Police

Big-incident-in-open-coal-mine-of-Chandrapur-Lalpeth. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.