गणेशोत्सवच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अश्वमेध कंपनीच्या माध्यमातून यंत्रणा उभी केली आहे. चंद्रपूर शहरात तीन ठिकाणी सायंकाळी ६ ते रात्री १२ या सहा तासात मोजणी केली जात आहे. Ashwamedh | Maharashtra Pollution Control Board
आवाजाने होणारे ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर, ४ सप्टेंबर, ६ सप्टेंबर, ९ सप्टेंबर या दिवशी मोहीम राबवली जाणार आहे. अश्वमेध कंपनीचे कर्मचारी सायंकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत प्रदूषणाची मोजणी करीत आहे. चंद्रपूर येथील जटपुरा गेट, चंद्रपूर शहर महानगर पालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ध्वनिप्रदूषण नोंदणी केली जात आहे
Noise Monitoring: • Spot Readings – Day time/Night time • Continuous Monitoring • DG Set Acoustic Noise Monitoring
गणेशोत्सव कालावधीत डीजे लावण्यास बंदी असतानाही इतर वाद्यवृंदामुळे ठिकठिकाणी आवाजाची मर्यादा ओलांडली जाते. ६५ ते ७० डेसिबलपेक्षा अधिक आवाज होऊन ध्वनिप्रदूषण होत असते. कोरोनाच्या काळात गणेश विसर्जन मिरवणुकीत कमी ध्वनीप्रदूषण झाल्याचे समोर आले. मात्र यंदा निर्बध उठल्याने ढोल-ताशा आणि बँजोमुळे ध्वनी प्रदूषण होऊ लागले आहे.