चंद्रपूर Chandrapur | शहरातील महाकाली कॉलरी परिसरामध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्या सराहीत गुन्हेगाराकडून पाच तलवारी व्यक्त करण्यात आल्या. या प्रकरणातील आणखी दोन गुन्हेगार फरार असून त्यांचा तपास सुरू आहे. Chandrapur crime breaking news
31 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार संजय आतुलवार, नायक पोलीस शिपाई संतोष येल्पुलवार, पोलीस शिपाई रवींद्र पंधरे, पोलीस शिपाई नितीन रायपुरे यांचे पथक पाठविले. या पथकाने महाकाली परिसरामध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला तेव्हा तो महाकाली कालरी परिसरात तलवार घेऊन फिरताना आढळून आले. पथकातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले. व्यंकटेश उर्फ वेंका कोपेलवार असे या गुन्हेगाराचे नाव असून तो आनंदनगर महाकाली कॅलरीवासी आहे त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी दोन साथीदार असल्याची माहिती मिळाली. तेव्हा घरी तलवारी आणि खंजर लपवून ठेवल्याचे उघड झाले. या आरोपींचा शोध घेतला असता ते अद्याप सापडलेले नाहीत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Chandrapur crime breaking news