अंडरग्राऊंड कोळसा खाणीवर बसलेल्या नकोडा येथील घरांना पडल्या भेगा, अनुचित घटना टाळण्यासाठी वेकोलीने सर्वे करावे, नागरिकांची मागणी
अंडरग्राऊंड कोळसा खाणीवर बसलेल्या चंद्रपुर तालुक्यातील नकोडा येथील घरांना भेगा पडल्या असून अनुचित घटना टाळण्यासाठी वेकोलीने सर्वे करावे व नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नकोडा येथील सरपंच किरण बंदूरकर यांच्यासह नागरिकांनी केली असून वेकोली प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. WCL underground coal mines
या परिसरात 1970 मध्ये भूमिगत कोळसा खाण सुरू करण्यात आली होती.त्यानंतर 2001 मध्ये ही कोळसा खाण बंद झाली.दरम्यान वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी या भागात रेती भरून योग्यरीत्या भूमिगत खाण भरली नाही.त्यामुळं या परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घराला तडे गेले आहे.इतकेच नव्हे तर 2013 मध्ये येथे भूस्खलन होऊन विजय ढाक यांचे संपूर्ण घर जमिनीत गाडल्या गेले.
त्यानंतर वेकोलीने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले होते.मात्र अजूनही त्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.आता तर अनेक नागरिकांच्या घराला भेगा पडत असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी वेकोलीने या भागात सर्वे करावे व ज्यांचे नुकसान झाले त्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली असून वेकोलीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
WCL underground coal mines Chandrapur