Ganesh Chaturthi 2022:
चंद्रपूर | काल बुधवारी श्रीगणेशाचे थाटात आगमन झाले. कालच गणरायांचं आगमन झाल्यानंतर आज (१ सप्टेंबर २०२२ रोजी अनेक घरगुती गणपतींचं म्हणजेच दीड दिवसांच्या गणरायांचं विसर्जन होत आहे. आज दीड दिवसाचे गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेत. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणा ऐकायला मिळत आहेत. या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विसर्जनासाठी २३ कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आले आहे. ganesha did diwas
Ganesh Chaturthi 2022:
शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. शरातील झोन क्र. १ (कार्यालय), साईबाबा मंदीर, दाताळा रोड, इरई नदी, तुकुम प्रा.शाळा (मनपा,चंद्रपूर)-नटराज टॉकीज (ताडोबा रोड), गांधी चौक मनपा पार्किंग,शिवाजी चौक, रामाळा तलाव, लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड, विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड, महाकाली प्रा. शाळा, सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ, झोन क्र. ३ (कार्यालय) येथे कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत