विद्युत वितरण कंपनीकडे मागणी
प्रतिनिधी:कारंजा (घाडगे)/जगदीश कुर्डा:
कारंजा ( घा ) कारंजा शहरातील गेल्या कित्येक दिवसापासून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवावा आणि ग्राहकांच्या तक्रारी संदर्भातील फोन लाईनमे न नी किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी उचलावा अशा मागण्यांचे निवेदन उप कार्यकारी अभियंता ए. डी. राजुरकर विद्युत वितरण कंपनी कारंजा यांच्याकडे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने केली आहे.
कारंजा वरून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या २२० के. व्ही. उपकेंद्र हेटीकुंडी पारेषण कंपनी येथून कारंजा करीता वीज पुरवठा घेतलेला आहे. तरीपण कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सणासुदीच्या काळात सुद्धा तीच परिस्थिती आहे. थोडासा वादळ- वारा आला तरी वीज खंडित होते, कधी वीज ट्रीप झाल्यासारखी पाच- पाच मिनिटा करीता खंडित होते त्यामुळे घरातील विद्युत उपकरणावर त्याचा परिणाम होतो. कधी रात्रीलाही वीज जाते, कधी तास- दोन तासाकरीता वीज खंडित राहते. त्यामुळे नागरिकांना, गृहिणींना, व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना, सरकारी कार्यालयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील स्थानिक विद्युत वितरण कंपनी संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
तसेच शहरात अनेक ठिकाणी वीज ताराच्या खाली झाडे वाढलेली आहेत, त्या झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करते. त्यामुळे कधी कधी ताराची स्पार्किंग होऊन त्या परिसरातील वीज खंडित होते. त्याकरीता नेहमी तत्परतेने वीज ताराखालील झाडाच्या फांद्या कापण्यात याव्या.
वीज संदर्भात ग्राहकांना कोणती अडचण आली. तर त्या संबंधित तक्रार करण्याकरीता स्थानिक संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा फोन स्वीकारून तत्परतेने सेवा द्यावी.
अशा विविध समस्या नागरी समितीने उप कार्यकारी अभियंता ए.डी. राजूरकर यांच्यापुढे मांडल्या व निवेदन सादर केले. निवेदन देतेवेळी कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.