Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कारंजा(घा.) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कारंजा(घा.) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ऑक्टोबर ०२, २०२२

आर्वी,आष्टी,कारंजाच्या शेतकऱ्यांनी दीड तास रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग

आर्वी,आष्टी,कारंजाच्या शेतकऱ्यांनी दीड तास रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग

माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात
तालुक्यातील हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर
शेतकऱ्याला पांगवण्यासाठी पोलिसांचा
 सौम्य लाठी चार्ज
प्रतिनिधी:कारंजा घाडगे;जगदीश कुर्डा
आर्वी विधानसभा मतदार संघातील आर्वी आष्टी कारंजा या तिन्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यातील वनक्षेत्र पैकी जवळपास 60 ते 70 टक्के विस्तारित क्षेत्र आहे. मागील काही वर्षापासून वनक्षेत्रातील हिंस्र प्राणी वाघ बिबट अस्वल इत्यादी प्राण्यांचा मानवी वस्तीवर वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.  त्यामुळे त्यांच्यापासून झालेल्या हल्ल्याच्या घटना मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आर्वी खरांगणा रेंजमध्ये 12 मनुष्यहानी व 393 पशुधन हानी च्या घटना घडलेल्या आहे.

या शेतकऱ्याच्या मृत परिवाराला शासकीय नोकरी व 50 लाख रुपये तात्काळ मदत करावी यासाठी आज गांधी जयंती व लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त कारंजा तालुक्यातील हेटी कुंडी फाट्यावर राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थित माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात जवळपास दीड तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. त्यामुळे अमर काळे यांनी आव्हान केले या वन्य प्राण्यांची लवकरात लवकर प्रशासनाने बंदोबस्त करावा त्याचप्रमाणे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला तात्काळ नोकरी द्यावी. तसेच कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत करावी नाहीतर पुन्हा यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा केली.

या आंदोलनाच्या वेळी प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त चोख ठेवलेला होता. पोलीस विभागाकडून पोलीस उपविभागीय अधिकारी साळुंखे त्याचप्रमाणे कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत पोलीस कर्मचारी वर्धा येथून आलेले दंगल विरोधी पथक मोठ्या संख्येने फौंज फाटा उभारण्यात आलेला होता.

मोठा अनर्थ टळला
हेटी कुंडी फाट्यावर झालेल्या चक्काजाम आंदोलन नात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते त्यावेळी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले त्यांचे नातेवाईक लहान मुले व गावकरी आंदोलनात सहभागी झाले पोलिसांना लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्ग खुला करणे महत्त्वाचे होते. पोलिसांनी जबरदस्तीने महामार्ग मोकळा करण्यासाठी सुरुवात केली. 

 त्यावेळी शेतकऱ्यावर सौम्य लाठीचार्ज करायला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी चिडले शेतकरी व पोलिसांत बाचाबाची सुरू झाली याचाच गैरफायदा काही उपद्रवी तत्वांनी घेऊन पोलिसांवर गोटे मारायला सुरवात झाली. त्यामुळे पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात आणली नसती तर अनुचित प्रकार घडण्याची संभावना नाकारता येत नव्हती.

ही परिस्थिती चिघळत असतानाच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटना स्थळावरून पळ काढला.या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अमर काळे यांनी केले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नितीन दर्यापूर कारंजा नगरपंचायत चे उपाध्यक्ष भगवान बुवाडे नगरसेवक विशाल इंगळे कमलेश कठाणे राजू लाडके हेमंत बन्नगरे त्याचप्रमाणे विजय बनसोड टिकाराम घागरे छोटू कामडी काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

गुरुवार, सप्टेंबर ०१, २०२२

कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित:कारंजातील विजेचा लपंडाव थांबवा

कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित:कारंजातील विजेचा लपंडाव थांबवा

नागरी समस्या संघर्ष समितीची
विद्युत वितरण कंपनीकडे मागणी
प्रतिनिधी:कारंजा (घाडगे)/जगदीश कुर्डा:
कारंजा ( घा ) कारंजा शहरातील गेल्या कित्येक दिवसापासून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवावा आणि ग्राहकांच्या तक्रारी संदर्भातील फोन लाईनमे न नी किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी उचलावा अशा मागण्यांचे निवेदन उप कार्यकारी अभियंता ए. डी. राजुरकर विद्युत वितरण कंपनी कारंजा यांच्याकडे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने केली आहे.

कारंजा वरून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या २२० के. व्ही. उपकेंद्र हेटीकुंडी पारेषण कंपनी येथून कारंजा करीता वीज पुरवठा घेतलेला आहे. तरीपण कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सणासुदीच्या काळात सुद्धा तीच परिस्थिती आहे. थोडासा वादळ- वारा आला तरी वीज खंडित होते, कधी वीज ट्रीप झाल्यासारखी पाच- पाच मिनिटा करीता खंडित होते त्यामुळे घरातील विद्युत उपकरणावर त्याचा परिणाम होतो. कधी रात्रीलाही वीज जाते, कधी तास- दोन तासाकरीता वीज खंडित राहते. त्यामुळे नागरिकांना, गृहिणींना, व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना, सरकारी कार्यालयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील स्थानिक विद्युत वितरण कंपनी संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

तसेच शहरात अनेक ठिकाणी वीज ताराच्या खाली झाडे वाढलेली आहेत, त्या झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करते. त्यामुळे कधी कधी ताराची स्पार्किंग होऊन त्या परिसरातील वीज खंडित होते. त्याकरीता नेहमी तत्परतेने वीज ताराखालील झाडाच्या फांद्या कापण्यात याव्या.

वीज संदर्भात ग्राहकांना कोणती अडचण आली. तर त्या संबंधित तक्रार करण्याकरीता स्थानिक संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा फोन स्वीकारून तत्परतेने सेवा द्यावी.

अशा विविध समस्या नागरी समितीने उप कार्यकारी अभियंता ए.डी. राजूरकर यांच्यापुढे मांडल्या व निवेदन सादर केले. निवेदन देतेवेळी कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

बुधवार, ऑक्टोबर १०, २०१८

अन शेतकऱ्याचे संपूर्ण घरच जाळून झाले खाक

अन शेतकऱ्याचे संपूर्ण घरच जाळून झाले खाक

१.५ लाख रुपयाचे नुसकान;शेतकरी झाला बेघर


प्रतिनिधी/कारंजा (घाडगे):
सेलगाव (लावणे) येथिल शेतकरी केशवराव चोपडे यांच्या घराला सकाळी १० ते ११ च्या सुमरात अचानक आग लागली या आगीमध्ये घरातील संपूर्ण वस्तू जळुन खाक झाल्या. 
विशेष म्हणजे घरातील संपूर्ण अन्न दाळ दाना व कपडे या सारखे जीवनावश्यक वस्तूदेखील जळुन खाक झाल्या. सेलगाव येथील सरपंच हनुमंतराव पठाडे यांनी तहसीलदार यांचेशी संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती दिली . या घराला लागलेली धकधकती आगेची आस हि घरच्या लगतच्या ३,४ घराला लागली असून आगीचे कारण कळु शकले नाही. 
अथक परीश्रमा नंतर गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आली या आगीमुळे १.५ लाख रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्या मागे २ मुले १ मुलगी आणि पत्नी असा परिवार असून त्यांच्याजवळ ४ एकर शेती असून लागलेल्या आगीमुळे चोपडे कुटुंबीय बेघर झाले आहे.

शुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८

मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन तर्फे वकृत्व स्पर्धा संपन्न

मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन तर्फे वकृत्व स्पर्धा संपन्न

कारंजा(घा.)/प्रतिनिधी:
विर शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्य मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन कारंजा तर्फे मॉडेल सीनियर कॉलेज मधे वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धा "अ" गट 5 वी ते 10 वी.,व "ब" गट 11 वी ते पदवित्तर पर्यन्त घेण्यात आली.अ गटाकरीता स्पर्धेचा विषय "स्वातंत्र चळवळ एक तेजस्वी क्रांतिपर्व" तर "ब" गटाचा विषय "भगतसिंगांचे क्रांतिकार्य व आजची युवापीढ़ी" हे ठेवण्यात आले होते.अ गटामधे 20 तर ब गटामधे 17 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या उदघाटणाला उदघाटक म्हणून संदिपजी काळे (संचालक भारत शिक्षण संस्था आर्वी),अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.धनवटे सर,तर प्रमुख अतिथि म्हणून शिरीषजी भांगे,(माजी सरपंच कारंजा),विजयजी गाखरे,सौ.बिडवाईक मॅडम,प्रा.काळे सर उपस्थित होते,.यावेळी स्पर्धेचे परीक्षक प्रा.डॉ.पखाले सर,सौ.इंदिराताई डोंगरे मॅडम,श्री.दिघदे सर,श्री.चाफले सर,यांना पाहुण्यांंच्या हस्ते शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.तर मॉडेल सिनिअर कॉलेज कारंजा चे विद्यार्थी प्रतिनिधि वैभव ढोबाळे यांचा विर भगतसिंगांनचा फ़ोटो देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन चे अध्यक्ष दिलीप जसुतकर यांनी केले.संदिपजी काळे ,शिरीषजी भांगे,धनवटे सर यांनी विद्यार्थ्यांना व स्पर्धकांना मार्गदर्शन केले.,राणासिंग बावरी यांनी भगतसिंगांच्या कार्याविषयी माहिती दिली.
"अ" गटामधे प्रथम पुरस्कार 1501 रु.रोख व ट्राफी संत भाकरे महाराज विद्यालय सुसुंद्रा ची विद्यार्थीनी कु.नंदिनी पाटमासे हिने पटकाविले,द्वितीय पुरस्कार 1001 रू.रोख व ट्राफी सनशाईन स्कूल कारंजा ची विद्यार्थीनी कु.ख़ुशी प्रेमसिंगजी महिल्ले हिने पटकाविले.ख़ुशी ही सर्व स्पर्धकामधे सर्वात छोटी वर्ग 5th ची विद्यार्थीनी होती,तिच्या सुंदर वकृत्वाने सर्व उपस्थित खुशीचे कौतुक व अभिनंदन करीत होते.तृतीय पुरस्कार 701 रु.रोख व ट्राफी मॉडेल हायस्कूल कारंजा चा विद्यार्थी देवांशु मंगेशजी पाचपोहर याने पटकाविले.
"ब" गटामध्ये प्रथम पुरस्कार 2001 रु.रोख व ट्राफी मॉडेल सिनियर कॉलेज कारंजा चा विद्यार्थी ओमप्रकाश रमेशजी तिवारी याने पटकाविले. द्वितीय पुरस्कार 1501 रु.रोख व ट्राफी मॉडेल सीनियर कॉलेज ची विद्यार्थीनी कु.कांचन उमेशजी बसेने हिने पटकाविले. तृतीय पुरस्कार 1001 रु.रोख व ट्राफी लाखोटिया भूतड़ा कॉलेज चा विद्यार्थी सुनील रविंद्रजी उघड़े याने पटकाविले.
बक्षिस वितरण समारंभाला प्रा.डॉ.धनवटे सर,किशोरजी भांगे,सनी जैस्वाल,शिवम कुरड़ा,प्रा.डॉ.मेश्राम सर,प्रा.डॉ.राघवते सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.भाग्यश्री चौधरी हिने केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नीलेश ढोबाळे,अभीजित जसुतकर,अंकित खांडवे,नीलेश चरडे,अमोल कामडी,रामेश्वर डोंगरे,हरीश घागरे,देवेश उकंडे,हरीश डोंगरे,मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन चे सर्व कार्यकर्ते तसेच मॉडेल सीनियर कॉलेज चे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनिंनी सहकार्य केले.

शनिवार, सप्टेंबर २९, २०१८

बसच्या धडकेत युवक जागीच ठार

बसच्या धडकेत युवक जागीच ठार

नारा रोडवर ARC कॉन्व्हेंट जवळ भयानक अपघात
प्रतिनिधी:कारंजा (घाडगे)
काटोल कारंजा मार्गे नरखेड जाणाऱ्या बसच्या धडकेत एक युवक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 9:30 च्या सुमारास नारा रोडवर ARC कॉन्व्हेंट जवळ घडली.रोशन गोविंदराव टिपले राहणार पारडी ता.आष्टी जिल्हा वर्धा असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
रोषण हा MH 32 Ac 0517 होंडा shine ने नेहमी प्रमाणे आपल्या कामावर जात होता. काटोल डेपोच्या MH 40 8389 ही बस काटोल डेपोतून कारंजा वरून नरखेड जात असताना दुचाकी स्वार रोशनला बसची जबर धडक लागल्याने तो धडकेत दूर फेकला गेला त्यात त्याच्या मेंदूला जबर मार लागला,व त्याचा जागीच मृत्यू झाला.तो प्रवर्धन सिड्स pvt.ltd मध्ये काम करत होता,अपघातानंतर घटनास्थळी चांगलीच गर्दी जमली होती.तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.