चांपा/प्रतिनिधी:
संततधार पावसामुळे वडद नदीला पूर आल्याने नागपुर वरून कामावरून घरी परत येतांना वडद नदीला मोठा पूर आल्याने नागपुरच्या वेगवेगळ्या कंपनीत काम करणारे सात जण रात्रभर अडकले .
उमरेड तालुक्याच्या उत्तर कडील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून वडद येथील सात कर्मचारी शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे उमरेड तालुक्यातील सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. आधीच पावसामुळे व इतर नदी नाल्याचे पाणी त्यात शिरल्याने पुरामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. आसपासच्या शेतातही पाणी शिरले. संपूर्ण परिसर जलमय झाला, रस्ताही दिसत नव्हता. यामुळे सात कर्मचाऱ्यांनी रात्रभर पूर कमी होण्याची वाट पहावी लागली व पूर कमी होईपर्यत नदीच्याकडेला असलेल्या झाडाखाली सात जण अडकले होते पावसाचे पाणी ओसरल्यावर येथून निघता येईल असा विश्वास असल्याने कर्मचारी झाडाखाली रात्रभर अडकले .
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सात वाजतापासून सर्व कर्मचारी वडद नदीच्याकडेला झाडाखाली अडकलेले होते. एअरपोर्ट , मिहान , डिफेन्स कंपनी, होंडा कंपनी ,आदी कंपनीचे कर्मचारी संदीप पवार मयुर अश्वजीत ढाकणे , बालू लोणारे , प्रमोद धुंदते, विनोद धुंदते , राजू रोहणकर , चंद्रशेखर वाघधरे हे सर्व कर्मचारी वडद नजीकच्या नदीच्या कडेला झाडाखाली रात्रभर उपाशी होते .