Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

wardha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
wardha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, मार्च २२, २०२३

सनशाईन स्कूलमध्ये गुढी प्रदर्शनी आयोजित

सनशाईन स्कूलमध्ये गुढी प्रदर्शनी आयोजित


उमेश तिवारी/ कारंजा:
21 मार्च मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्या च्या शुभ मुहूर्तावर सनशाईन स्कूल कारंजा (घा )येथे पूर्व दिवसाला गुढी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली.

या प्रदर्शनी मध्ये वर्ग 5वी व वर्ग ६वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.यामध्ये पलक पालीवाल ,फाल्गुनी ढगे ,प्रांजली खवशी ,सांझी मोटवानी,मृणाली केवटे ,समृद्धि भांगे,काव्या भिंगारे,आराध्या ढबाले,श्रुति एकापूरे,शर्लिन घागरे,रुधवी दळवी , अक्षरा चाफले,हर्शिका बन्नागरे,हेमांगी बारंगे,मोनिका डंढाळे,स्वरा वानखेडे,अलिजा शाह,राम शेखार,आदित्य वाघ,कृष्णा पाठे,सानिध्य दिढेकर या विद्यार्थांनी सहभाग घेतला.

या प्रदर्शनीचे उदघाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रेमसिंग महीले यांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना गुढी पाडवा चे महत्व थोडक्यात समजवून सांगितले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी गुढी प्रदर्शनीचा अनोखा आनंद अनुभवला.व गुढी प्रदर्शनाची सांगता झाली.

गुरुवार, सप्टेंबर ०१, २०२२

कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित:कारंजातील विजेचा लपंडाव थांबवा

कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित:कारंजातील विजेचा लपंडाव थांबवा

नागरी समस्या संघर्ष समितीची
विद्युत वितरण कंपनीकडे मागणी
प्रतिनिधी:कारंजा (घाडगे)/जगदीश कुर्डा:
कारंजा ( घा ) कारंजा शहरातील गेल्या कित्येक दिवसापासून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवावा आणि ग्राहकांच्या तक्रारी संदर्भातील फोन लाईनमे न नी किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी उचलावा अशा मागण्यांचे निवेदन उप कार्यकारी अभियंता ए. डी. राजुरकर विद्युत वितरण कंपनी कारंजा यांच्याकडे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने केली आहे.

कारंजा वरून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या २२० के. व्ही. उपकेंद्र हेटीकुंडी पारेषण कंपनी येथून कारंजा करीता वीज पुरवठा घेतलेला आहे. तरीपण कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सणासुदीच्या काळात सुद्धा तीच परिस्थिती आहे. थोडासा वादळ- वारा आला तरी वीज खंडित होते, कधी वीज ट्रीप झाल्यासारखी पाच- पाच मिनिटा करीता खंडित होते त्यामुळे घरातील विद्युत उपकरणावर त्याचा परिणाम होतो. कधी रात्रीलाही वीज जाते, कधी तास- दोन तासाकरीता वीज खंडित राहते. त्यामुळे नागरिकांना, गृहिणींना, व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना, सरकारी कार्यालयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील स्थानिक विद्युत वितरण कंपनी संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

तसेच शहरात अनेक ठिकाणी वीज ताराच्या खाली झाडे वाढलेली आहेत, त्या झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करते. त्यामुळे कधी कधी ताराची स्पार्किंग होऊन त्या परिसरातील वीज खंडित होते. त्याकरीता नेहमी तत्परतेने वीज ताराखालील झाडाच्या फांद्या कापण्यात याव्या.

वीज संदर्भात ग्राहकांना कोणती अडचण आली. तर त्या संबंधित तक्रार करण्याकरीता स्थानिक संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा फोन स्वीकारून तत्परतेने सेवा द्यावी.

अशा विविध समस्या नागरी समितीने उप कार्यकारी अभियंता ए.डी. राजूरकर यांच्यापुढे मांडल्या व निवेदन सादर केले. निवेदन देतेवेळी कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

सोमवार, जुलै १८, २०२२

कारंज्यात चिखलातून माखलेल्या रस्त्यावरून नागरिकांना काढावी लागते वाट:नागरिकांना मनस्ताप

कारंज्यात चिखलातून माखलेल्या रस्त्यावरून नागरिकांना काढावी लागते वाट:नागरिकांना मनस्ताप


कारंजा (घाडगे)जगदीश बाबू:
कारंजा घाडगे शहरातील वस्तीतील रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून सततच्या पावसाने रस्ता चिखलाने माखलेला आहे संपूर्ण रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हे ठिकाण डासाच्या उत्पत्तीचे केंद्र झाले आहे. या रस्त्याने आवागमन करणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत ही समस्या तात्काळ निकाली काढावी अशी मागणी होत आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत नागरिकांच्या जीवाचे काही देणेघेणे नसल्याचे आता नागरिक बोलत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी तसेच बँकेतील अधिकारी पंचायत समिती बांधकाम विभागाचे ऑफिस सरकारी कॉटर्स कान्वेंट मॉडेल कॉलेज न्यायालय रस्त्यावर येत असल्यामुळे इथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे विशेषता प्रभारी मुख्याधिकारी याच रस्त्यावरून आवागमन करतात.
गेल्या कित्येक दिवसापासून हा रोड चिखलमय झालेला आहे. या रोडवर डांबरीकरण झालेले होते. मात्र त्यावर खड्डे पडलेले होते. त्या रोडवर नगरपंचायत ने मुरूम टाकून पुन्हा रोड उंच केला. आता त्या रोडची परिस्थिती अशी झाली आहे की खाली रोड आणि त्यावर मुरमाचे भरन त्यामुळे कित्येक अपघात या ठिकाणी होत आहे बाजूलाच न्यायालयाची इमारत आहे. परंतु अजून पर्यंत नगरपंचायत प्रशासनाला जाग आलेली नाही.
या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार उद्भभवत असून सुद्धा लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून नुसती बघ्याची भूमिका घेत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
मोटर सायकल रोडवर घसरुन अनेक अपघात
गेल्या सहा महिन्यापासून हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्याविषयी आमदार.माजी आमदार,नगरपंचायतचे अधिकारी पदाधिकारी यांना वारंवार सांगून सुद्धा या रस्त्याचे काम झाले नाही. सतत पाऊस पडत असून पावसाचे पाणी निघून जात नाही परिणामी च्या रस्त्याला डोहाचे स्वरूप येत राहते कित्येक मोटरसायकल वरून इथे घसरून पडले आहे.
चारचाकी वाहने आणि ऑटो रिक्षा चालकांची या पाण्यातून वाहन टाकण्याची हिंमत होत नाही. नागरिकांना ही जीव मुठीत घेऊनच हा रस्ता मार्गक्रमण करावे लागत आहे. शेकडो विद्यार्थी या रस्त्यावरून अवागमन करतात मात्र अजून नगरपंचायत याकडे लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही.
धक्कादायक:कारंजाच्या आठवडी बाजारात विजेच्या धक्क्याने २ गाईचा जागीच मृत्यू

धक्कादायक:कारंजाच्या आठवडी बाजारात विजेच्या धक्क्याने २ गाईचा जागीच मृत्यू



कारंजा (घाडगे)/जगदीश बाबू:
 रविवार दिनांक 17. 7.2022 ला कारंजा येथील आठवडी बाजारात विद्युत प्रवाह आणि रात्री आठच्या दरम्यान दोन आईचा जागीच मृत्यू झाला. रविवारला कारंजा येथे आठवडी बाजार भरत असतो. त्या निमित्याने भाजीपाल्याचा व्यापार करणारे व्यापारी आपले पाल ठोकून भाजीचा व्यवसाय करीत असतात. 

 तालुक्यातून बरेच ग्रामीण भागात नागरिक बाजार करण्यासाठी कारंजाला येतात. आठवडी बाजारात व्यापाराची पाल टाकून व्यवसाय करीत असताना पाल लावण्याचा खिळा जमिनीच्या वायरिंग वर ठोकल्या गेल्या मुळे  बाजूला विद्युत पोल असल्यामुळे त्या पोलची वायरिंग जमिनीतून असल्यामुळे त्या वायरिंगवर त्या तालपत्रीचा खिळा आल्यामुळे त्या लोखंडी रॉडला करंट आला रात्रीचे लाईट त्या पोल  वरील सुरू असल्यामुळे रात्री आठवडी बाजारात गाई फिरत होत्या. 

आणि त्या ताडपत्रीच्या  रॉडला गाईचा स्पर्श झाला आणि त्या गाईला करंट लागून जागीच मृत्यू झाला.  त्याच प्रमाणे दुसरी गाय सुद्धा त्या गाई  जवळ गेली तिचा पण जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या वेळेस नागरिक जर त्या दुकानाजवळ गेले  असते तर मोठी जीवित हानी झाली असती बोलल्या जात आहे.


weekly market Karanja, electrocution and death