Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै १८, २०२२

कारंज्यात चिखलातून माखलेल्या रस्त्यावरून नागरिकांना काढावी लागते वाट:नागरिकांना मनस्ताप


कारंजा (घाडगे)जगदीश बाबू:
कारंजा घाडगे शहरातील वस्तीतील रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून सततच्या पावसाने रस्ता चिखलाने माखलेला आहे संपूर्ण रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हे ठिकाण डासाच्या उत्पत्तीचे केंद्र झाले आहे. या रस्त्याने आवागमन करणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत ही समस्या तात्काळ निकाली काढावी अशी मागणी होत आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत नागरिकांच्या जीवाचे काही देणेघेणे नसल्याचे आता नागरिक बोलत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी तसेच बँकेतील अधिकारी पंचायत समिती बांधकाम विभागाचे ऑफिस सरकारी कॉटर्स कान्वेंट मॉडेल कॉलेज न्यायालय रस्त्यावर येत असल्यामुळे इथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे विशेषता प्रभारी मुख्याधिकारी याच रस्त्यावरून आवागमन करतात.
गेल्या कित्येक दिवसापासून हा रोड चिखलमय झालेला आहे. या रोडवर डांबरीकरण झालेले होते. मात्र त्यावर खड्डे पडलेले होते. त्या रोडवर नगरपंचायत ने मुरूम टाकून पुन्हा रोड उंच केला. आता त्या रोडची परिस्थिती अशी झाली आहे की खाली रोड आणि त्यावर मुरमाचे भरन त्यामुळे कित्येक अपघात या ठिकाणी होत आहे बाजूलाच न्यायालयाची इमारत आहे. परंतु अजून पर्यंत नगरपंचायत प्रशासनाला जाग आलेली नाही.
या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार उद्भभवत असून सुद्धा लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून नुसती बघ्याची भूमिका घेत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
मोटर सायकल रोडवर घसरुन अनेक अपघात
गेल्या सहा महिन्यापासून हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्याविषयी आमदार.माजी आमदार,नगरपंचायतचे अधिकारी पदाधिकारी यांना वारंवार सांगून सुद्धा या रस्त्याचे काम झाले नाही. सतत पाऊस पडत असून पावसाचे पाणी निघून जात नाही परिणामी च्या रस्त्याला डोहाचे स्वरूप येत राहते कित्येक मोटरसायकल वरून इथे घसरून पडले आहे.
चारचाकी वाहने आणि ऑटो रिक्षा चालकांची या पाण्यातून वाहन टाकण्याची हिंमत होत नाही. नागरिकांना ही जीव मुठीत घेऊनच हा रस्ता मार्गक्रमण करावे लागत आहे. शेकडो विद्यार्थी या रस्त्यावरून अवागमन करतात मात्र अजून नगरपंचायत याकडे लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.