अ.भा.गुरुदेव सेवा महिला व पुरुष भजन मंडळ,भिवापुर वार्ड,चंद्रपुर च्या वतीने क्रांती दिन सोहळा साजरा करण्यात आला...वंदनिय राष्टसंत श्री.तुकडोजी महाराज ह्यांनी 1942 ह्यावर्षी आपल्या ओजस्वी भाषण व क्रांतीकारी भजनांनी चिमुर व आष्टी ला क्रांती घडवुन आणली..
त्यावेळी वं.तुकडोजी महाराज हनुमान मंदीर वार्ड,चंद्रपुर येथे चातुर्मास कार्यक्रम असल्यामुळे वास्तव्यास होते..चिमुरला मोठी क्रांती झाली त्यामुळे इंग्रजांनी वं.तुकडोजी महाराजांना हनुमान मंदीर,भिवापुर वार्ड,चंद्रपुर येथुन 28 आगस्ट 1942 ला पहाटे अटक करुन त्यांची तुरुंगात रवानगी केली..ह्या दिवसाची आठवण म्हणुन सन 2003 पासुन अ.भा.गुरुदेव पुरुष व महीला भजन भिवापुर वार्ड मंडळाच्यावतीने क्रांती दिन साजरा करण्यात येतो...सदर कार्यक्रमाला अ.भा.गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी श्री.दत्ताभाऊ हजारे,सरचिटणिस श्री.नंदनवारजी,डाॅ. अनंत हजारे ,प्रा.मुरकूटे,श्री.तोडासेजी तसेच गुरुदेव भक्त ऊपस्थित होते...कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरुष मंडळाचे अध्यक्ष श्री.घनश्याम पायघन, सचिव श्री.राजेंद्र आखरे ,महिला मंडळाच्याअध्यक्षा श्रीमती प्रेमिला गटलेवार,सचिव सौ.पुष्पा पायघन तसेच मंडळाच्या महीला व पुरुष मंडळींनी अथक परीश्रम घेतले..कार्यक्रमाचे संचालन सौ.पुष्पा पायघन,तर आभार प्रदर्शन श्री.राजेंद्र आखरे ह्यांनी केले... Celebration of Revolution Day on behalf of Bhiwapur Ward, Chandrapur