कारागृह ध्वजदिना निमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृहात बंदीवांनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व खेळ सप्ताह समारोप व बक्षिस वितरण
दि.०१ सप्टेंबर २०२२ गुरुवार :- चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे महाराष्ट्र कारागृह ध्वजदिन साजरा करण्यात आला. यावेळी कारागृह बाहेरील परिसरात सकाळच्या सत्रात कारागृहाचे प्रभारी अधीक्षक श्री. रविंद्र जगताप यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये कारागृह ध्वज फडकविण्यात आ यावेळी तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार यांचे करवी इतर कारागृहाचे गणवेशधारी कर्मचारी यांचे सह परेड संचलन करण्यात आले. तदनंतर बंदीबांधवा करिता देशभक्तीपर स्वहविहार, नृत्य, गवळण, भजन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. Cultural program for inmates in District Jail

सदर सांस्कृतिक कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारागृहाचे प्रभारी अधीक्षक श्री.रविंद्र जगताप तर प्रमुख उपस्थितीमध्ये तुरुंगाधिकारी श्री. महेशकुमार माळी, तुरुंगाधिकारी श्री.विठ्ठल पवार, महिला तुरुंगाधिकारी श्रीमती ज्योती आठवले, गायक कलाकार श्री.रोशनसिंग बघेल, तुरुंग शिक्षक श्री. ललित मुंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात ही मान्यवरांचे स्वागत समारोहाने झाली. तदनंतर कारागृहातील बंदीजन यांनी भजग, गवळण, देशभक्तीपर गीते, नृत्य सादर करुन इतर बंदीजणांचे मनोरंजन केले. तदनंतर कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले चंद्रपूरचे गायक कलाकार श्री. रोशनसिंग बघेल यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन उपस्थितांचे मनोरंजन केले.
कारागृहात ध्वजादिनानिमित्त सप्ताहामध्ये बंदीजणांच्या घेण्यात येणा-या विविध खेळ स्पर्धाचा समारोप घेण्यात आला यामध्ये खेळामध्ये कॅरम बोर्ड स्पर्धा, चेस बोर्ड स्पर्धा, पुल अप्स स्पर्धा, डिप्स स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी खेळांचा समावेश होता. तर महिला विभागात महिला बंद्याचे मनोरंजनासाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा व इतर आनुशंगीक खेळांचा समावेश होता. सदर खेळामध्ये व स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या बंद्यांना मान्यवरांचे हस्ते पुस्तक, चित्रकला वही, नोटबुक, पेन इत्यादी साहित्य बक्षिस स्वरुपात भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी सुत्रसंचालन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी तुरुंगाधिकारी श्री. महेशकुमार माळी, कारागृह कर्मचारी श्री. मनोज धोटे, श्री. यशवंत गंगोई, महिला रक्षक शितल डहारे, प्रिया नारनवरे, करिश्मा डोकरीमारे इत्यांदी कर्मचारी यांनी विशेश परिश्रम घेतले.