घुग्गुस शहरात मूर्त्यांची तोडफोड, पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल
घुग्गुस (Ghughus) शहरातील अमराई वार्डात मूर्त्यांची अज्ञात इसमाने तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक बबन पुसाटे घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान परिसरात शांतता राखण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. Superintendent of Police Arvind Salve
घुग्गुस (Ghughus) शहरातील अमराई वार्डात असलेल्या मंदिरातील मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी गुरुवारी रात्री तोडफोड केली. याची माहिती शुक्रवारी सकाळी नागरिकांनी घुग्गुस पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास केला.दरम्यान पोलीस अधीक्षक अरविद साळवे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली व अज्ञात आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश घुग्गुस पोलिसांना दिले आहेत. police (Ghughus)
Superintendent of Police Arvind Salve