मेट्रो रेल्वे मार्गाजवळ पतंग उडविणे धोकादायक
नागपूर १२: महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पांतर्गत ऑरेंज लाईन (सिताबर्डी इंटरचेज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि मिहान डेपो पर्यंत) व ऍक्वा लाईन (सिताबर्डी ते लोकमान्य नगर आणि पुढे हिंगणा डेपो पर्यंत) मेट्रो ट्रेनचे नियमित संचालन सुरु आहे. मेट्रो ट्रेनचे संचालन २५००० वोल्ट विद्युत प्रवाहाच्या माध्यमाने होतो. ट्रेनच्या संचालनाकरिता विद्युत प्रवाह सुरु असतो व पतंगिचा मांजा या विद्युत तारांमध्ये अडकल्यास यातून प्रवाहित होणाऱ्या विजेमुळे दुर्घटना घडू शकते.
सर्व नागरिकांना या माध्यमाने सूचित करण्यात येते कि,मेट्रो रेल मार्गाच्या जवळ पतंग उडवू नये. मेट्रो रेल मार्गाजवळ पतंग उडविल्यास, मेट्रो मार्गिकेवरील विजेच्या तारांमध्ये पतंग व मांजा अडकू शकतो. यातुन उदभविणाऱ्या संभाव्य धोक्यापासून नागरिकांनी सावध असावे तसेच अश्या घटनांमुळे प्रवासी सेवा देखील प्रभावित होऊ शकते.