जागतिक छायाचित्रदिनी पाथरी येथे वृक्षारोपण
पाथरी :- जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शुक्रवार रोजी पोलीस स्टेशनच्या आवारात छायाचित्रकार व ठाणेदार यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. (Pathari)
19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रकार दिन म्हणून सर्व छायाचित्रकार बंधू मिळून छायाचित्रकार दिवस साजरा करीत असतात अशा या छायाचित्रकारांची वास्तविकता म्हणजे दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल ने टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले. तथापि, फोटोग्राफी या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे.
हजार शब्दांत जे सांगता येणार नाही ते एक छायाचित्र सांगते, अशाच या छायाचित्रकारांसाठी 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रकार दिवस पाळला जातो या दिनाचे औचित्य साधून छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर सलग्नित सावली तालुका संघटनेच्या वतीने पाथरी व परिसरातील छायाचित्रकार बांधव यांनी पोलीस स्टेशन पाथरीच्या आवारात पोलीस स्टेशन पाथरी येथील ठाणेदार मंगेश मोहोड तसेच छायाचित्रकार बांधव यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी ग्रामपंचायत पाथरीचे उपसरपंच प्रफुल तुम्मे, प्रवीण द्विवेदी, दिनेश बंडावार, राजू नागोसे, राहुल भरडकर, प्रतीक करकाडे, नितीन गंडाटे, सुधीर मशाखेत्री, संदीप वंजारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Tree plantation at Pathari on World Photography Day Tree plantation at Pathari on World Photography Day