Chandrapur Crime News
दिनांक १७/०६/२०२१ रोजी सिटी पोलीस स्टेशन मध्ये दाखल घरफोडीच्या गुन्हयातील २ आरोपीस अटक करण्यात आली आहे.
दिनांक ०२/०७/२०२२ ला रात्रौ ०८:०० वा . फिर्यादी नामे यशवंता धन्नु भागरकर वय ६० वर्ष , धंदा मजुरी , रा . महाविरनगर चंद्रपुर ही एकटी घरी राहत असल्याने आपल्या घराला ताला लावुन कामाला गेली आणि दिनांक ०३/०७/२०२२ ला सकाळी ०७:०० वा . घरी परत आली. तिला घरातील सामान अस्ताव्यस्त दिसले तसेच कवेलु काढुन दिसले आणि तीने देवघराचे खाली खड्डा करून त्यात ठेवलेले १ ) एक लांब पोत ( मंगळसुत्र ) काळे मणी व सोन्याचे मणी आणि पदक असलेले २४ ग्रॅम वजनाचे कि अंदाजे ४,००० / - रू . २ ) एक काळी मण्याची पोत चार ग्राम सोन्याचे डोरले अंदाजे किं . २,००० / - रु . ३ ) दोन सोन्याचे टॉप्स दोन ग्रम अंदाजे वजन कि . १,००० / - रू . ४ ) एक पायल जोडी २१० ग्रॅम वजन किमंत अंदाजे ३,००० / - रू . ५ ) पाचशे रू . २८ नोटा एकुण १४,००० / - रू . असा एकुण अंदाजे २४,००० / - रू . चा माल चोरी झाले असा रिपोर्ट दिला .
सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथकातील पो.हवा विलास निकोडे ब . नं . १ ९ ०४ पो . स्टे . चंद्रपुर शहर यांचेकडे दिला . त्यांनी व गुन्हे शोध पथकातील इतर अधिकारी कर्मचारी यांचे मदतीने रेकार्डवरील गुन्हेगार तपासले.
गुन्हा उघडकीस आणण्याचे उद्देशाने अथक परिश्रम घेतले परंतु शोध लागत नव्हता . दिनांक १८/०८/२०२२ रोजी एक बातमीदारचा फोन वाजला दोन इसम संशईतरीत्या सराफा लाईन मध्ये सोने विकनेकरीता फीरत आहे . अश्या फोन वरून सपोनी जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने
सराफा लाईन गाठुण संशईत आरोपी क . १ ) बाबा खान रूस्तम खान पठाण वय ३३ वर्ष , जात मुसलमान , धंदा मजुरी , रा . महाविरनगर एमएसईबी भिवापुर वार्ड , चंद्रपुर ता . जि . चंद्रपुर . २ ) गणेश धन्नुलाल ढेकलेवाले वय ३३ वर्ष , धंदा मजुरी , रा . महाविरनगर एमएसईबी भिवापुर वार्ड , चंद्रपुर ता . जि . चंद्रपुर यांना ताब्यात घेवून त्यांची कसुन चौकशी केली .
त्यांचे कडुण ) एक लांब पोत ( मंगळसुत्र ) काळे मणी व सोन्याचे मणी आणि पदक असलेले ६.९ ५० ग्रॅम वजनाचे कि अंदाजे ३५,००० / - रु .२ ) एक काळी मण्याची पोत चार ग्राम सोन्याचे डोरले अंदाजे किं . २०,००० / - रू .३ ) दोन सोन्याचे टॉप्स १.९ ०० ग्रम अंदाजे वजन कि १०,००० / - रू . ४ ) एक पायल जोडी २१० ग्रॅम वजन किमंत अंदाजे १२,००० / - रू . संपुर्ण दागिण्याची किंमत आजच्या दरानुसार असा एकुण ७७,००० / - रू . चा माल हस्तगत केला . सदरची कार्यवाही ही मा . पोलीस अधिक्षक श्री अरविंद साळवे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर नंदनवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा पोलीस निरीक्षक आ सुधाकर अंभोरे यांचे नेतृत्वात गुन्हेशोध पथकातील स.पो.नी जयप्रकाश निर्मल यांनी केली.
Burglary, Theft, Police, Crime, Investigation, Complaint, Accused