न्यायालयाच्या आदेशाने घुग्गुस शहरातील अवैध होर्डिंग्ज, बॅनर नगरपरिषदेने हटविले
Nagpur bench of Bombay High Court न्यायालयाच्या आदेशाने घुग्गुस शहरातील अवैध होर्डिंग्ज, बॅनर नगरपरिषदेने शुक्रवारी हटविले आहे.ही कारवाई मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गेल्या काही वर्षांत अनधिकृत फलकांचे शहर म्हणून घुग्गुस शहर ओळखला जात आहे, या अनधिकृत फलकांनी केवळ शहराचे विद्रुपीकरण झाले असे नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचेही प्रश्न निर्माण केले आहेत.तसेच नगर परिषदेचा कर सुद्धा मोठ्या प्रमाणात बुडत आहे.
सत्ताधारी व विरोधी अशा सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये फलक उभारण्याची जणू स्पर्धाच लागली होती. परिणामी, शहरातील गल्लीबोळांसह प्रमुख रस्ते व चौक अनधिकृत फलकांच्या जंजाळात सापडले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळे येण्याबरोबर अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
दरम्यान अनाधिकृत होल्डिंग्स व बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती.त्यानंतर आज शुक्रवारी न्यायालयाच्या निर्देशानुसार घुग्गुस शहरातील सर्व बॅनर होर्डिंग्ज हटविण्यात आले आहे.
Illegal Hoardings, Banners Removed by Municipal Council in Ghuggus City on Court Order
विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांना शहरात बॅनर,होर्डिंग्ज लावायचे असल्यास त्यांनी नगरपरिषद कडे रीतसर परवानगी घेऊन व कर भरूनच बॅनर होर्डिंग्ज लावावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी दिला आहे.
Illegal Hoardings, Banners Removed by Municipal Council in Ghuggus City on Court Order