Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट १६, २०२२

Tiger Update | वाघाने एका शेतकऱ्याला केले ठार

Tiger killed a farmer and injured a grazier in bramhapuri today.


ब्रम्हपुरी येथे आज वाघाने एका शेतकऱ्याला ठार केले तर गुराख्याला जखमी केले.





वाघाच्या हल्यात गुराखी जखमी 
ब्रम्हपुरी तालुक्यातील पद्मापूर येथील घटना
खासदार अशोक नेते यांनी घेतली भेट 


ब्रम्हपुरी तालुक्यात आज सकाळी वाघाच्या हल्यात दुधवाही येथिल शेतकरी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर येथे वाघाने गुराख्यावर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली . प्रभाकर धोंडू मडावी असे जखमी गुराख्याचे नाव आहे .तालुक्यात एकाच दिवशी वाघाने दोघांवर हल्ला करून एकास ठार तर एकास जखमी केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
प्रभाकर धोंडू मडावी या गुराख्याने पद्मापूर गावापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर गुरांना चराई करिता नेले होते जंगल परीसरात गुरे चारत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने गुरख्यावर हल्ला चढविला आरडा ओरड केल्याने वाघ जंगलच्या दिशेने पळून गेला यात गुराखी . प्रभाकर धोंडू मडावी हा गंभीर जखमी झाला .मडावी याला उपचार्थ ,ब्रम्हपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तत्परतेने खासदार अशोक नेते .माजी आमदार अतुल देशकर यांनी जखमीची ब्रम्हपुरी रुग्णालयात भेट घेत विचारपूस केली.व तात्काळ विभागीय वन अधिकारी दिपेश मल्होत्रा यांच्याची बैठक घेऊन वाढत्या मानव वन्यप्राणी संघर्षाबाबत चिंता दर्शवित वाघाच्या बंदोबस्ता करिता ठोस पाऊले वनविभागाने उचलावी असे निर्देश दिले . यावेळी नागराज गेडाम,अविनाश पाल.मनोज वठे,साकेत भानारकर,प्रा.अशोक सालोटकर, अविनाश मस्के ,तनय देशकर उपस्थित होते.

chandrapur news| chandrapur india |  news 34 chandrapur |  chandrapur breaking news today|  chandrapur pin code | chandrapur temperature | 
chandrapur weather | chandrapur news | 
chandrapur district | chandrapur map | 
chandrapur to pune train | 
is pc chandra open today | 
chandrapur express news | 
chandrapur district news | 
news of chandrapur | 
nagpur india|  | 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.