स्वातंत्र्यविराच्या परिवारासोबत साजरा केला अमृत महोत्सव
जनविकास सेनेचा अभिनव उपक्रम
Chandrapur News
चंद्रपूर (Chandrapur) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर रोडवरील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करुन दुचाकी रॅली काढली. त्यानंतर चंद्रपुरातील स्वातंत्र्यवीर खुशालचंदजी खजांची यांची सून व छगनलालजी खजांची यांची पत्नी सुशिलाबाई खजांची यांची वडगाव प्रभागातील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्यासोबत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.
सुशिलाबाई खजांची व त्यांचे पुत्र ॲड. प्रशांत खंजाची यांना खादीची शॉल, श्रीफळ व सुताचा हार अर्पण करून जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या हस्ते महिला आघाडीच्या मनीषा बोबडे, युवा आघाडीचे अक्षय येरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला. यावेळी सुशिलाबाई यांनी ‘तु चाल पुढ तुला र गड्या भिती कशाची, पर्वा बि कुणाची' हे १९३७ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुंकू’ या मराठी चित्रपटातील गाणे गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी गायनाने सार्वजनिक जीवनात काम करण्यासाठी नवीन ऊर्जा व प्रेरणा मिळाली अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली. यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे नितीन बन्सोड यांच्यासह जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे, गुलाबराव पुनवटकर, देवराव हटवार, इमदाद शेख, आकाश लोडे, गितेश शेंडे, प्रफुल्ल बजाईत, ओम हटवार, मेघा दखणे, जयश्री पुनवटकर, निलिमा वनकर, बबिता लोडलीवार, भाग्यश्री मुधोळवर आदी उपस्थित होते.
खंजाची परिवाराला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा
ॲड. प्रशांत खजांची यांचे आजोबा खुशालचंदजी खजांची यांचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. १९२० च्या आसपास चंद्रपूरमध्ये पंडित बालगोविंद तिवारी यांच्या नेतृत्वात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून पंडित पार्टी सुरू केली. तेथूनच त्यांचा सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. एप्रिल १९२२ मध्ये नगरपालिका उपाध्यक्ष, १९२९ मध्ये नगरपालिका अध्यक्ष झाले. पालिकेतील ब्रिटन राजा जॉर्ज पंचम यांचे छायाचित्र काढून तेथे म. गांधींचे छायाचित्र लावणे, अस्पृश्यांची वेगळी शाळा बंद करून एकाच शाळेत सामावून घेणे, असे अनेक धाडसी निर्णय त्यांच्या कारकीर्दीत चंद्रपूर नगरपालिकेने घेतले. असहकार आंदोलन व स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. १९३७ मध्ये चंद्रपूर वर्धा मतदार संघातून मध्य प्रांताचे आमदार म्हणून ते निवडून आले होते. खुद्द महात्मा गांधी यांनी हरिजनमध्ये लेख लिहून त्यांच्या कार्याची दखल घेतली. त्यांचे पुत्र छगनलाल खजांची यांनीसुद्धा तरुण वयात स्वातंत्र चळवळीमध्ये सहभाग घेतला. त्यांनासुद्धा कारावास भोगावा लागला होता.
Chandrapur News | MH34 | News 34 weather for nagpur
nagpur weather
nagpur university
nagpur airport
nagpur temperature
nagpur mumbai expressway
breaking news | breaking news headlines
news live | google news |
local news | azadi ka amrut mahotsav
chandrapur news| chandrapur india | news 34 chandrapur | chandrapur breaking news today| chandrapur pin code | chandrapur temperature |
chandrapur weather | chandrapur news |
chandrapur district | chandrapur map |
chandrapur to pune train |
is pc chandra open today |
chandrapur express news |
chandrapur district news |
news of chandrapur |
nagpur india| |