Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट ०९, २०२२

स्वातंत्र्याच्या समरात ऑगस्ट क्रांती मैदानाचं महत्व अनन्य साधारण - मा. ना. सुधीर मुनगंटीवार @smungantiwar


https://www.khabarbat.in/

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी क्रांती दिनी केले शहिदांना अभिवादन*


मुंबई (Mumbai News)  : स्वातंत्र्याच्या इतिहासात मुंबईच्या क्रांती मैदानाचं अनन्य साधारण महत्व आहे ; देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना त्रिवार अभिवादन करून स्वतंत्र भारताचे वैभव टिकवून ठेवण्याची, राष्ट्रभक्तीची प्रेरणा या क्रांती स्थळावरून मिळते असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानावर क्रांती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली, त्यावेळी ते बोलत होते.

ना मुनगंटीवार म्हणाले , स्वातंत्र्य समरात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी इंग्रजांना 'चले जाव' चा इशारा देत स्वातंत्र्याचा हुंकार दिला , तो उठाव अभूतपूर्व होता. त्या दिवसाची आठवण आपल्याला नेहमी राहायला हवी. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला या स्थळावरून सदैव प्रेरणा मिळत राहील असे भावपूर्ण उद्गार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भारत मातेच्या थोर सुपुत्राना आदरांजली वाहून नव्या जबाबदारीची सुरुवात करत असल्याने एक सकारात्मक ऊर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन, ब्रिटिश गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण कायम रहावी तसेच नव्या पिढीला या हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी क्रांती दिन महत्वाचा आहे असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी मुंबई भाजपा सचिव अमोल जाधव , भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनीलसिंह , बल्लारपूर येथील माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम रायकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

breaking news
breaking news headlines
news live
google news
local news 
azadi ka amrut mahotsav
chandrapur news
chandrapur india
news 34 chandrapur
chandrapur breaking news today
chandrapur pin code
chandrapur temperature
chandrapur weather
chandrapur news
chandrapur district
chandrapur map
chandrapur to pune train
is pc chandra open today
chandrapur express news
chandrapur district news
news of chandrapur
nagpur india
weather for nagpur
nagpur weather
nagpur university
nagpur airport
nagpur temperature
nagpur mumbai expressway

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.