पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या उर्स (यात्रा) ( Hazrat Makhdum Shahabuddin Shah alias Gaibishah Wali ) निमित्त कारागृह भाविकाकरिता आज खुले करण्यात आले. यावेळी पोलीस अधिक्षक अरविद साळवे, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, यांच्यासह कारागृह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मोहरमनिमित्त जिल्हा कारागृहाच्या आतील दर्गावर भाविकांनी पूजा अर्चा करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे (District Jail) आतील परिसरातील पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांचे समाधीस्थळी सालाबाद प्रमाणे या वर्षी मोहर्रम सणानिमीत्य (moharam festival date 2022) दिनांक 08/08/2022 व दिनांक 09/08/2022 रोजी “उर्स" (यात्रा) आयोजित करण्यात येत असल्याने समाधीच्या दर्शनाकरिता कोविड -19 नियमाचे काटेकोरपणे पालन करुन सकाळी 10.00 ते 05.00 या कालावधीतच कारागृह खुले ठेवण्यात आले होते.