चंद्रपूर (प्रतिनिधी) -
रुरल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन संभाजीनगर (औरंगाबाद) चे संस्थापक अध्यक्ष -निसर्गोपचार महर्षी डॉ.प्रल्हादजी रत्नापारखी यांचे काल दि. ३०/८/२०२२ रोजी औरंगाबाद येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. निसर्गोपचार सेवक म्हणून त्यांनी केलेले कार्य मोठे आहे . निसर्गोपचार चिकित्साचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून ते दरवर्षी ते श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी ( जि. चंद्रपूर) येथे येत असत आणि या भागांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक निसर्गोपचार सेवकांना स्वयंस्फूर्त मार्गदर्शन करीत असे. अड्याळ टेकडी चे तत्कालीन अध्यक्ष डॉ. नवलाजी मुळे यांचे ते परममित्र होते. सन १९९६ ते २००८ या कालावधीत विविध गावांमध्ये चंद्रपूर जिल्हा स्तरावरील निसर्गोपचार अधिवेशनात ते सहभागी झाले होते . राज्यस्तरीय निसर्गोपचार संभाजीनगर येथे साखरे मंगल कार्यालयात ते दरवर्षी निसर्गोपचार संमेलन घेत असे . त्या संमेलनात अनेकदा पूज्य श्री तुकारामदादा गीताचार्य मार्गदर्शक म्हणून गेलेले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या जीवन कार्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. या महान विभूतीपासून ते प्रेरणा घेऊन ग्रामगीतेचाही प्रचार प्रसार औरंगाबाद भागात करीत असे. " संत प्रभात " नावाचे पाक्षिक ते चालवित असे.
Senior Naturopath Dr. Prahlad jeweler
दिवंगत प्रल्हादजी रत्नपारखी यांचा निसर्गोपचार क्षेत्रातील अभ्यास मोठा होता . श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अडयाळ टेकडी चे तत्कालीन अध्यक्ष डॉ. नवलाजी मुळे यांच्या मुळे त्यांचा माझ्याशी परिचय झाला होता. निसर्गोपचार चिकित्सेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने १९९६ ते २०१५ या कालावधीत वडसा, कोरची , कुरखेडा ब्रह्मपुरी आदी गावात निसर्गोपचार अभ्यास शिबिराचे आयोजन केले होते. त्यांच्या रूपात आम्ही ज्येष्ठ निसर्गोपचारक गमावला आहे, अशा शब्दात ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी डॉ. रत्नपारखी यांना आदरांजली अर्पण केली .