गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चंद्रपूर जिल्ह्यातील खासदार आमदार आणि राजकीय नेत्यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. खासदार बाळू धानोरकर यानाच्या आकाशवाणी केंद्रजवळील जनसंपर्क कार्यालय येथे गणेशाची स्थापना करण्यात आली. त्यांनी मनोभावे पूजा-अर्चना करून श्री ची स्थापना केली, यावेळी शेतकऱ्यांच्या शिवारात पिकांची, घरात #धनधान्याची #समृद्धी येवो. राज्यातील सर्वांना सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य लाभो,
श्रीगणरायांच्या कृपाशिर्वादानं #महाराष्ट्र आणि देश #कोरोनामुक्त होऊ दे हीच प्रार्थना ! गणरायाच्या चरणी केली. केली. वन मंत्री सुधीर मुनगटीवार यांच्या निवासस्थानी आज #गणरायाचे आगमन झाले.
महाराष्ट्राला (Maharashtra) सुजलाम सुफलाम कर, महाराष्ट्रातील जनतेला भरभरून आशीर्वाद दे, सुख दे समाधान दे. तू सुखकर्ता आहे, दुखहर्ता आहे. या महाराष्ट्रावरचं विघ्न दूर कर, अशी प्रार्थना वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना बाप्पांच्या चरणी केली. चंद्रपूर येथील त्यांच्या घरी आज गणपतीची स्थापना करण्यात आली. तसेच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरीदेखील आकर्षक आरास सजावट करून गणरायाची स्थापना करण्यात आली.