Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २०, २०२२

उद्या नागपूर जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज


शेतकरी चिंतातूर


नागपूर : हवामान विभागाने नागपूर जिल्ह्याकरीता उद्या रविवारी,२० ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे 90 ते 95 टक्के भरले आहेत. भरलेल्यापैकी त्यातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे. रामटेक तालुक्यातील तोतलाडोह प्रकल्प 92 टक्के, पारशिवणी तालुक्यातील नवेगाव खैरी प्रकल्प 90 टक्के,रामटेक तालुक्यातील खिंडसी प्रकल्प 100 टक्के व

उमरेड तालुक्यातील वडगाव प्रकल्प 91 टक्के भरलेला आहे. त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवू शकतो. पिकांची आधीच नासाडी झालेली असताना उद्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस बरसल्यास पुन्हा बळीराजा चिंतातूर होईल.


मुंबई : राज्यात काही भागात पावसाची रिपरीप पुन्हा वाढणार आहे. सध्या राज्यात काही भागामध्ये अनेकदा पाऊस संधी साधत आहे. आता राज्यातील विविध भागात आगामी तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशाच्या विविध भागात पाऊस पुन्हा एकदा सुरु होणार आहे.




हवामान विभागाने राज्यात पुढील तीन दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आजपासून (दि.20) ते 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघरसह मुंबईच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात 22 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विदर्भामध्येही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अकोला, अमरावतीसह वर्धा जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
- Heavy rain is expected in Chandrapur, Gadchiroli, Buldhana, Gondia, Nagpur districts today and tomorrow. Akola, Amravati along with Wardha districts are likely to experience moderate rain. Meanwhile, moderate rainfall has been predicted in Jalna, Hingoli, Nanded, Parbhani districts of Marathwada.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.