Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट ३०, २०२२

वीज केंद्राने केली सहा विद्यार्थ्यांची "संशोधन सहाय्यक'"साठी निवड

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने "संशोधन सहाय्यक'" म्हणून शासकीय अभियांत्रिकी चंद्रपूरच्या सहा विद्यार्थ्यांची केली निवड



चंद्रपूर ३० ऑगस्ट २०२२ : आजच्या स्पर्धात्मक जगात नवनवीन संशोधने आणि सुधारणा यांना नेहमीच चालना व वाव देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वीज उत्पादनाच्या अतिशय गुंतागुंतीच्या व तांत्रिक स्वरूपाच्या कामात दैनंदिन समस्यांवर मात करण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने नुकतेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना "संशोधन सहाय्यक" म्हणून घेण्याबात सामंजस्य करार करण्यात आला.

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक पुरुषोत्तम जाधव, बाळासाहेब थिटे, संजय मारोड़कर, डॉ. मानवेंद्र रामटेके तसेच कार्यकारी संचालक भीमाशंकर मंता यांच्या मार्गदर्शनात नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई,रायगड, कराड, अमरावती आणि जळगाव अशा विविध ९ अभियांत्रिकी शासकीय महाविद्यालयात सुमारे ६० संशोधन सहाय्यक म्हणून घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी व सोबत अर्थार्जन व्हावे असे महानिर्मितीस अभिप्रेत आहे.

याप्रसंगी महानिर्मिती विदर्भ विभागाचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता प्रशासन सुहास जाधव ,कार्यकारी अभियंता रामेश्वर सोनेकर, प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशिक्षण विभाग राजकुमार गिमेकर उपस्थित होते. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर प्राचार्य डॉ.एस. जी. आकोजवार प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी डॉ पी. एस. लोंढे, डॉ.अनंत देशपांडे, डॉ. राजेश राजूरकर डॉ. दिलीप वाघाडे, डॉ. राजेश पेचे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर (M. O. U.) स्वाक्षऱ्या झाल्या.

औष्णिक वीज उत्पादनात अभियांत्रिकी शाखांचे अनन्यसाधारण महत्व आहे त्यात इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, उपकरणीकरण क्षेत्रात संशोधन सहाय्यकाला वीज उत्पादन क्षेत्रातील उत्तम तांत्रिक कौशल्य, कमीत कमी संयंत्र वापर, प्रभारी मनुष्यबळ वापर ,जल ,वाफ इंधन ,वीज बचत, गुणवत्तापूर्ण अंकेशन ,विश्लेषण समस्येचे मूळ कारण शोधणे, जुन्या संचांचे नूतनीकरण ,आधुनिकीकरण, राख आणि कोळसा याचे दर्जेदार व्यवस्थापन, पर्यावरण संतुलन, वातावरण बदल ,प्रदूषण नियंत्रण अपरंपारिक ऊर्जा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब ,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन विकासात्मक अभ्यास आणि शिफारसी इत्यादीचा प्रकल्प अहवाल सादर करावा लागणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानात युवा पिढी अग्रेसर असल्याने अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी महानिर्मितीने उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या संशोधन सहाय्यक यास एक वर्ष कालावधीसाठी प्रतिमाह २५ हजार रुपये विद्यावेतन तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन महिने कालावधी प्रतिमाह २० हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे.


Chandrapur Maharashtra India MH34
सदर संशोधन सहाय्यक योजनेअंतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील प्रत्येकी तीन पदवीधर आणि तीन पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांचे मुलाखत घेऊन निवड समितीने निवड केली आहे.यामध्ये पदवीधर शिक्षण घेणाऱ्या मेकॅनिकल विभागातून चैतन्य पोतुनवार, वैष्णवी फुलझेले व इलेक्ट्रिकल विभागातून मोनाली नारायने तसेच पदवी शिक्षण घेणाऱ्या मेकॅनिकल विभागातून कृष्णा वंजारी इलेक्ट्रिकल विभागातून श्रुतीका ठाकरे उपकरणीकरण विभागातून दुर्गेश राठोड या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षण कालावधी यशस्वी पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.