Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२

आज सकाळी 11 वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा; गुजरात पॅटर्न राबवणार



मुंबई- सुरत -गुवाहाटी असा दौरा करून परत आल्यानंतर राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाले. राज्यात एकनाथ शिंदे (maharashtra cm eknath shinde) सरकार येऊन महिना लोटला. मात्र मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकले नाही. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असताना आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. शपथ विधी सोहळा मंगळवारी सकाळी ११ ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना निमंत्रण देण्यात आले आहे. भाजपकडून गुजरात पॅटर्न आणून सर्व नवीन चेहरे दिले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.


(know why not maharashtra state govenrment cabinet expansion)


निरोप येताच संभाव्य मंत्री मुंबईकडे रवाना
राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून, मुंबईतून निरोप येताच मतदारसंघात असणारे अनेक संभाव्य मंत्री मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत. काही आमदार मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी मुंबईत तळ ठोकून आहेत. तर काहींनी मतदार संघातील दौरे रद्द केलेले आहेत.
मागील महिनाभरापासून रखडलेला राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आजच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सकाळी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गेले होते. याठिकाणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात विस्ताराबाबत बैठक झाली. मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी उरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पहिल्या टप्प्यात 20 ते 25 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यातील भाजप आणि शिंदे सेनेतील काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचीही चर्चा आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे, प्रवीण दरेकर, रवी राणा, नितेश राणे आदींचा समावेश आहे. तर शिंदे गटातील दीपक केसरकर, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भरत गोगावले, उदय सामंत यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

maharashtra | cabinet | expansion | eknath shinde | devendra fadnavis | government | maharashtra cm eknath shinde | maharashtra state govenrment cabinet expansion

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.