घुग्गुस (Ghughus) | शहरातील अमराई वार्डात घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला घुग्गुस पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून 11 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले आहे.दुखनपाल उर्फ दुखा झुरी कैथल असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. Chandrapur Police
घुग्गुस शहरातील अमराई वार्डात राहणारे संतोष लोंढे (Santosh Londhe) हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. अशातच ते परत आले असता घराचा टाळा तुटलेल्या अवस्थेत दिसला. घरात प्रवेश करून बघितले असता कपटाचे लॉक तुटलेले दिसले.त्यानंतर त्यातील ठेवलेले 16 हजार रुपये चोरी झाल्याचे यांच्या लक्षात आले.त्यांनी लगेच घुग्गुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व तपास सुरू केला.त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दुखनपाल उर्फ दुखा झुरी कैथल याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.पोलिसांनी आरोपीकडून 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
#Ghughus #Chandrapur #Police
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे,महेंद्र बुजाडे,मनोज धकाते,प्रकाश करमे, रणजित भुरसे आदींनी केली आहे. police