Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२

चंद्रपूर जिल्हा कारागृह दोन दिवस खुले राहणार! काय कारण समजून घ्या..



khabarbat Chandrapur

चंद्रपूर (Chandrapur) । जिल्हा कारागृहाच्या आतील पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या उर्स (यात्रा) ( Hazrat Makhdum Shahabuddin Shah alias Gaibishah Wali ) निमित्त कारागृह भाविकाकरिता दोन दिवस खुले राहणार आहे.  muharram 

चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे (District Jail) आतील परिसरातील पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांचे समाधीस्थळी सालाबाद प्रमाणे या वर्षी मोहर्रम सणानिमीत्य (moharam festival date 2022) दिनांक 08/08/2022 व दिनांक 09/08/2022 रोजी “उर्स" (यात्रा) आयोजित करण्यात येत असल्याने समाधीच्या दर्शनाकरिता कोविड -19 नियमाचे काटेकोरपणे पालन करुन सकाळी 10.00 ते 05.00 या कालावधीतच कारागृह खुले ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत कोविड -19 चे दोन्ही लस घेतलेल्या भाविकांनाच कारागृहाचे आतिल पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांचे समाधीचे दर्शना करिता प्रवेश देण्यात येणार असून याकरिता भाविकांनी मास्क परिधान करणे, सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. moharam 2022


असे असतील निर्बंध 
कारागृहाचे आत कोणत्याही भाविकाला मोबाईल फोन , कॅमेरा , खाद्य पदार्थ उदा. पेढे, बर्फी अथवा इतर खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आले असून, तसे आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येणार असल्याने भाविकांनी कोविड -19 च्या वरील नियमाचे अनुपालन करुनच समाधीस्थळी दर्शनाकरिता यावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे कारागृह प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

या दरम्यान स्थानिक पोलीसांचा दोन्ही दिवस कडक बंदोबस्त लावण्यात आला असून, कॉविड -19 चे नियमांचे भाविकांकडून अनुपालन करुन घेण्याबाबतचे निर्देश पोलीसांना प्राप्त झाले आहे.

moharam festival date 2022
moharam 2022
muharram 2022
muharram festival date 2022
muharram 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.