Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ०७, २०२२

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे स्तनपान सप्ताह

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे स्तनपान सप्ताह

𝐁𝐫𝐞𝐚𝐤𝐢𝐧𝐠 𝐍𝐞𝐰𝐬

उपजिल्हा रुग्णालय वरोरा (warora) जिल्हा चंद्रपूर येथे स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या समारोप कार्यक्रमात ईनरव्हील क्लब च्या अध्यक्षा सौ मधूताई जाजू ,रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ सौ साक्षी ऊपंचलेवार , डॉ प्रफुल्ल खूजे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.प्रास्ताविक सौ गीतांजली ढोक आहार तध्न यांनी केले सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी 1ते 7 तारखेपर्यत च्या कार्यक्रमांची रूपरेषा समजावून सांगितली. स्तनपान शिक्षण आणि समर्थनासाठी पाऊल उचला या थीम खाली त्यांनी आपल्या भाषणात मिल्क बाॅंक विषयी समजावून सांगितले स्तनपान का करावे त्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी त्यांच्या जिवनातील अनुभव सांगितला .


आपल्या मूलाबरोबर त्यांनीं 21 दिवस एका मूलीला आपले दुध पाजले.कारण त्या मुलींची आई सीरीअस होती ही गोष्ट 2002 ची आहे समाजात राहताना आपण काहीतरी सामाजिक कार्य करावे ही जाणीव मनात ठेवून आदर्श कार्य करण्यात आले आपणही असे कार्य करावे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात यावा.असै आवाहन करण्यात आले.तसेच हिरकणी ची कथा, कांगारू मदर केअर, विषयी माहिती दिली. बाळाला बांधायचे कसै त्याचे काय फायदे हे समजून सांगीतले तसेच सरकार ने नोकरदार वर्गासाठी बाळंतपण च्या 6 महीने रजा व बालसंगोपन रजा 6 महीने मंजुर केल्या आहेत जेणेकरून नोकरदार मातेने बाळाचे संगोपन, स्तनपान बरोबर केले पाहिजे कारण भावी पिढी हि सूद्रुढ,सूशिक्षित ,सूसंस्कारी घडवायची आहे तर मातेनै स्तनपान हे योग्य पध्दतीने व मनस्वास्थ बरोबर ठेवून करायला पाहिजे असे प्रतिपादन केले.सौ सोनाली राईसपायले यांनी सूत्रसंचालन केले व सौ वंदना बूरीवार यांनी आभारप्रदर्शन केले डॉ खूजे यांनी कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच जाजू यांनी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले व डॉ साक्षी यांनी मार्गदर्शन केले.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी पून्हा पोषण आहार सप्ताह ची घोषणा केली व त्यात लाभार्थी यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमांसाठी सौ मीना मोगरे अधीपरीचारीका यांनी सहकार्य केले रांगोळी स्पर्धा व पाककृती स्पर्धा यांचे बक्षीस वितरण प्रमूख पाहूने व अध्यक्ष यांच्या उपस्थितीत करण्यात आले . आणि सर्व कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतली व हजर होते.


𝐁𝐫𝐞𝐚𝐤𝐢𝐧𝐠 𝐍𝐞𝐰𝐬


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.