Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १८, २०२२

वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांनी घेतली निसर्ग रक्षणाची शपथ


https://www.khabarbat.in/

अदाणी आंदोलनाचे प्रतीक वृक्षास राखी बांधून कार्यक्रम साजरा

शहरातील विविध महाविद्यालयाचा सहभाग - इको - प्रो च्या आयोजनाचे सलग 14 वे वर्ष

*वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमातुन पर्यावरण रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा*


Chandrapur News | Eco Pro
युवकांनी आपल्या अवतभवतीचे निसर्ग, वन-वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणसाठी सदैव तत्पर राहावे, पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबध्द राहावे येणारी पीढ़ी या कार्यात सक्रिय असली पाहिजे असा संदेश कार्यक्रमातुन मान्यवरांनी दिला.

आज लोहारा-मामला (lohara) वनक्षेत्रातील अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही एकत्रीत येत इको-प्रो तर्फे आयोजन करण्यात आले. यावेळी तताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उप संचालक बफर जी गुरुप्रसाद, डॉ स्वप्निल माधमशेट्टीवार, उप प्राचार्य, सरदार पटेल महाविद्यालय, किशोर जामदार, adv वर्षा जामदार, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे, प्रा. डाॅ. बारसागडे, प्रा कुलदीप गोंडर, प्रा संतोष कावरे व विविध महविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, संदीप जीवने, विविध महाविदयालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी- विदयार्थीनी व वनकर्मचारी उपस्थित होते. Eco pro


चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा असुन ‘वाघांचा जिल्हा’ ही नवी ओळख निर्माण झालेली आहे. या जिल्हयात वन-वन्यजिव या नैसर्गिक संपेदसह मोठया प्रमाणात खनिज संपत्ती सुध्दा आहे. याच खनिजामुळे या जिल्हयात औदयोगिक विकास सुध्दा झालेला आहे. या जंगलाच्या जमिनीखाली असलेल्या कोळशामुळे येथे मोठया प्रमाणात कोळसा खान प्रकल्प, कोळसा आधारित विदयुत प्रकल्प निर्माण करण्यात आले आहे. जंगलाखाली असलेल्या कोळसामुळे येथील वन्यजीव समृध्द जंगलावर कोळसा खान प्रकल्पाचे संकट नेहमीच उभे राहते. आणी प्रश्न उभा राहतो तो येथील पर्यावरणाचा, वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवासाचा, त्यांच्या भ्रमणमार्गाचा म्हणुन येथील वन-वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सदैव तत्पर राहीले पाहीजे.



इको-प्रो सह अनेक पर्यावरणवादी संस्था-संघटनाच्या तसेच चंद्रपूरकरांच्या जनआंदोलनामुळे प्रस्तावीत अदानी कोळसा खानीचा प्रस्ताव नाकारला गेला होता. या आंदोलनाच्या स्मृती जपत, आपला नैसर्गीक वारसा पुढील पिढीला सुस्थितीत हस्तांतरण करता यावे, याची जाणीवजागृती सर्व घटकामध्ये यावी याकरिता दरवर्षी ‘इतिहासात डोकावुन, भविष्यातील पर्यावरणाची सुरक्षीतता करीता लढण्यास बळ मिळावे’ हा उद्देश लक्षात घेउन इको-प्रो संस्थेच्या वतीने मागील 14 वर्ष पासुन लोहारा-मामला जंगलातील ‘अदाणी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षास राखी बांधुन चंद्रपूर शहरात वन-वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी 2009 साली प्रस्तावीत अदाणी कोळसा खाणीच्या विरोधात झालेल्या जन-आंदोलनाच्या स्मृतीना उजाळा दिला जातो. नव्या पिढीला हा निसर्गसंरक्षणाचा चंद्रपूर जिल्हयातील लढा कायमच स्मरणात राहावा म्हणुन या उपक्रमाचे आयोजन केले जाते.


या कार्यक्रमा दरम्यान लोहारा-मामला रोडवरील वनक्षेत्रातील ‘अदाणी गो बॅक’ आदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षास राखी बांधण्यात आली. यावेळी उपस्थितांना सदर उपक्रमाच्या आयोजनामागील भुमीका व आवश्यकता विषयी माहीती देण्यात आली. निसर्गाचे रक्षण करण्यास वनविभागासोबतच सामान्य नागरीक व गावकरी यांचे सुध्दा सहकार्य अपेक्षीत असुन आपल्या अवतीभवतीचे पर्यावरण व जैवविवीधतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहीजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करीत स्मृतीना उजाळा दिला. 


या कार्यक्रमात सरदार पटेल महाविद्यालय, एफईएस महाविद्यालय, डॉ खत्री महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, संभाजी राजे प्रशासकीय महाविद्यालय आदि के महाविद्यालय व इको-प्रो चंद्रपूर व भद्रावती सदस्य सहभागी झाले होते.


Sardar Patel College, FES College, Dr Khatri College, Social Work College, Sambhaji Raje Administrative College etc. College and Eco-Pro Chandrapur and Bhadravati




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.