चंद्रपूर (Chandrapur) : तीन कोटींच्या खंडणीसाठी ऑनलाईन क्रिकेट सट्टा व जुगाराचे रॅकेट चालविणाऱ्या प्रदीप गंगमवार व त्याचा मित्र राजेश झाडे या दोघांचे चौघांनी मिळून सरताज या मित्राच्या मदतीने अपहरण केल्याप्रकरणी तिन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा , चंद्रपूर यांनी केली 24 तासाचे आत अटक केली आहे.
Kidnapping-of-Cricket-bookie
येथील महाकाली वॉर्ड (Mahakali) परिसरातील बालपणीचे मित्र प्रदीप गंगमवार व राजेश झाडे या दोघांवर जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. ऑनलाईन क्रिकेट सट्टा प्रकरणी गंगमवार यांना गडचिरोली पोलिसांसोबतच चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील पोलिसांनी अनेकदा अटक केली आहे. खुनाच्या आरोपात 10 वर्षे शिक्षा भोगलेल्या सरताज हाफिज यांच्यासोबत ओळख झाली होती. 15 ऑगस्टला पावसात तिघेही जुगार खेळण्यासाठी निघाले. तुकुमला पोहचल्यावर वाहन लावताना अचानक 4 जणांनी गाडीत प्रवेश केला आणि त्यांना चाकुचा व बंदुकीचा धाक दाखवत गंगमवारला 3 कोटीची मागणी केली.
गंगमवार यांनी 50 लाख देण्याची तयारी दाखवली. यासाठी त्यांनी यवतमाळ येथील मित्राला फोन केला. मात्र, पैसे 16 ऑगस्टला मिळेल असे त्याने सांगितले असता त्या 4 जणांनी वाहन मूल, सिंदेवाही, नागभीड व उमरेड मार्गे थेट नागपूरला आणले. वाटेत उमरेडला पोहचल्यावर चार पैकी 1 त्याठिकाणी उतरला, त्यानंतर वाहन पहाटे 3 वाजताच्या सुमारास मोमीनपुरा येथे दाखल झाले. तेथे वाहन थांबविण्यात आले. याचा फायदा घेत राजेश झाडे हा गाडीच्या खाली उतरत वाचवा वाचवा ओरडू लागला. नागरिक राजेशकडे धावले. नागरिकांची गर्दी जमा होत असताना आरोपीने राजेशला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी मोमीनपुरा (Mominpura) येथे पोलिस असल्याने त्यांनी राजेशला सोडले. अपहरणाचा कट फसला असे वाटताच आरोपींनी पळ काढला. त्यांच्यासोबत सरताजनेही पळ काढला. पोलिसांनी राजेश व प्रदीपला पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. गंगमवारच्या तक्रारीची नोंद घेत गुन्हा दाखल केला.
घटनेटच्या उजेडात आलेल्या माहितीनुसार, 15/8/22 रोजी तुकूम चंद्रपूर येथून दोन इसमाची दिवसा दुपार दरम्यान खंडणीचा उद्देशाने अपहरण करण्यात आले होते . यातील आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवून फिर्यादी व त्याचा मित्र यांना गाडीत बसवून नागपूर येथील मोमीनपूरा परीसरात घेवून गेले . तेव्हा रात्री दरम्यान एक आरोपी सिगरेट पिण्या करीता खाली उतरला सदर ठिकाणी लोकांची गर्दी दिसल्याने फिर्यादीचा मित्राने संधी पाहून गाडीचा लॉक काढून जोर जोऱ्यात बचाव बचाव असे ओरडल्याने तेथे लोक व परिसरातील पोलीस तेथे आल्याने आरोपी इसम पळून गेले .
त्यानंतर तहसिल पोलीस नागपूर, जि.चंद्रपूर येथे झाल्याने फिर्यादी व त्याचा मित्र यास पो.स्टे . दुर्गापूर येथे घेवून फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे . दुर्गापूर येथे अप . क्र . 136/2022 384 , 385 , 364 ( A ) , 120 ( ब ) , 143 , 147 , 149 भादवी सहकलम 4 , 25 आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
दि . 16/08/22 पो.स्टे.दुर्गापूर (Durgapur) रोजी रात्री दरम्यान सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा.पोलीस अधीक्षक सा . यांचे आदेशान्वये पो.नि.बाळसाहेब खाडे , स्थानिक गुन्हे शाखा , चंद्रपूर यांनी लागलीच स.पो.नि. बोबडे , स.पो.नि. कापडे , पो . उपनि.कावळे यांचे पथक तयार करून आरोपीचे माग घेण्याकरीता मार्गदर्शन करून आदेशीत केले.
सदर गुन्हयातील आरोपींचा नविन मोबाईल नंबर प्राप्त करून सायबर सेलचे मार्फतीने तांत्रीक तपास करून गुप्त माहितीच्या आधारे घुग्घुस येथील ईसम नाम अमित चमन सारीढेक वय 30 हा आरोपींचे संपर्कात असल्याबाबत माहिती वरून घुग्घुस येथे गेले असता सदर ईसमास अधिक वर्ष रा घुग्घुस विचारपुस करून त्याने यातील तीन आरोपी नामे 1 ) मोहम्मद सरताज अब्दुल हाफिज वय 36 वर्ष रा बिनबा गेट रहेमतनगर चंद्रपुर 2 ) शेख र शेख ईस्माईल उर्फ रशीद वय 38 वर्ष रा नालसाहब रोड मोमिनपुरा नागपुर 3 ) अजय पुनमलाल गौर वय 35 वर्ष रा हसापुरी छोटी खदान नागपुर यांना यांना त्याने येथील द - गेट रेस्टॉरन्ट अॅन्ड लॉज येथे रूमवर थांबले असल्याचे माहिती दिल्यावर सदर लॉजवर गेले असता " तिन्ही तीन्ही आरोपी काहि वेळेपूर्वी एका घुग्घुस पांढऱ्या रंगाची होन्डाई क्रेटा गाडी क एमएच 48 एसि 8447 ने पसार झाल्याचे कळताच त्यांचा पाठलाग करत असतांना सदर वाहन गडचांदूर मार्गे जात असल्याची खात्रीशीर खबर मिळाल्याने मा.पोलीस अधीक्षक , चंद्रपूर यांचे आदेशान्वये SDPO नंदनवार सा चंद्रपुर व SDPO नाईक साहेब गडचांदुर यांनी सबंधीत पो.स्टे . पो.स्टे . हददीत नाकाबंदी लावली.
स्थानिक गुन्हे शाखा , चंद्रपूर चे पथक सदर वाहनाचा पाठलाग करीत जात असता . पो.स्टे . कोरपना ठाणेदार याचें सम्पर्कात 2 राहून माहिती देत असता सदर वाहन पो.स्टे . कोरपणा हददीत नाकाबदी दरम्यान पोस्टे कोरपणा येथील पोलीस स्टाफने गाडी क एमएच 48 एसि 8447 हि थांबवीली त्या गाडी मागे असलेले स्थागुशाचे पथकाने सदर आरोपीतांना लागलीच ताब्यात घेवुन यातील वरील तीन्ही आरोपी पकडले . सदर गुन्हयातील तीन्ही आरोपी व गुन्हयातील गाडी ताब्यात घेवुन पोस्टे दुर्गापुर यांचे ताब्यात देण्यात आले .
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरवींद साळवे , प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक श्री शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे , सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे पो उप नि अतुल कावळे , पो.हवा . संजय आतकूलवार , ना.पो.कॉ. संतोष येलपूलवार , पो.कॉ. गोपाल आतकुलवार , प्रांजल झिलपे , रविंद्र पंधरे यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे . दुर्गापूर येथील पोलीस अधिकारी हे करीत आहे .
https://www.khabarbat.in/
महाराष्ट्र राज्य पोलीस