Chandrapur Maharashtra News
चंद्रपूर : शांताराम किसनदास राठोड , गटनिदेशक ( कंत्राटी ) व प्रशांत वसंतराव वांढरे , निदेशक ( तासिका / मानधन तत्त्वावर ) दोन्ही शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर ता . चिमुर जि . चंद्रपुर यांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक करण्यात आली. Corruption
तक्रारकर्ती हि मौजा चिमुर ता . चिमुर जि . चंद्रपुर येथील रहीवासी असुन ती शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर येथे तासिका / मानधन तत्त्वावर गणित व अभियांत्रिकी चित्रकला निर्देशक म्हणुन नेमणुकीस आहे . तक्रारकर्ती यांचे माहे फेब्रुवारी / २०२२ ते मे / २०२२ पर्यंतचे चार महिन्याचे मानधन काढुन दिल्याचे मोबदल्यात व उर्वरित पुढील तिन महिन्याचे मानधन काढण्याचे कामाकरिता शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर chimur येथील श्री . शांताराम किसनदास राठोड , गटनिदेशक ( कंत्राटी ) यांनी दि . ११/०८/२०२२ रोजी तक्रारकर्ती कडे १२,००० / - रु . ची मागणी केल्याच्या पडताळणी कार्यवाहीवरुन आज दिनांक १८/०८/२०२२ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाहीदरम्यान श्री . शांताराम किसनदास राठोड , गटनिदेशक ( कंत्राटी ) यांनी तक्रारकर्तीकडे १२,००० / -रु . लाचेची मागणी करुन प्रशांत वसंतराव वांढरे , निदेशक ( तासिका / मानधन तत्त्वावर ) यांचे मार्फतीने लाचरक्कम स्विकारल्याने श्री . शांताराम किसनदास राठोड , गटनिदेशक ( कंत्राटी ) व प्रशांत वसंतराव वांढरे , निदेशक ( तासिका / मानधन तत्त्वावर ) यांना रंगेहाथ पकडण्यात आले . Industrial training institute
पुढील तपास कार्य सुरु आहे . सदरची कार्यवाही ही श्री . राकेश ओला , पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक , ला.प्र . वि . नागपुर , श्री . मधुकर गिते , अप्पर पोलीस अधिक्षक , ला.प्र.वि. नागपूर , तसेच पोलीस उपअधिक्षक , श्री . अविनाश भामरे , ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो . नि . जितेंद्र गुरनुले , नापोकॉ . नरेशकुमार नन्नावरे , नापोकॉ . संदेश वाघमारे , पो.अ. अमोल सिडाम , रविकुमार ढेंगळे , म.पो.अ. मेघा मोहुर्ले व ला.प्र.वी. चंद्रपुर चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे . यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात येत आहे .
#khabarbat #india #chandrapur