Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २७, २०२२

Chandrapur local Breaking News | अखेर ७ किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळला




सावली ।  येथील असोलामेंढा गोसेखुर्द नहरात बुडत असलेल्या आपल्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात बहिणीला जलसमाधी मिळाली. मन हेलावून टाकणारी ही घटना शुक्रवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. काजल अंकुश मक्केवार (वय 11 वर्ष) असे मृतक बहिणीचे नाव आहे.  तिचा मृतदेह घटने स्थळापासून 7 किमी अंतरावर मिळाला. पोळ्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

असोलामेंढा तलावाच्या नहराद्वारे सावली तालुक्यातील शेतीच्या सिंचनाकरिता पाणी पुरवठा केल्या जातो. याच नहराला लागूनच वस्ती आहे. वस्तीतील महिला कपडे धुण्यासाठी नहरावर जातात. दरम्यान, शुक्रवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास काजल व तिची बहीण सुस्मिता या दोघी कपडे धुण्यासाठी नहरावर गेल्या होत्या. त्यांच्या मागे चवथ्या वर्गात शिकत असलेला भाऊ राहुल मक्केवार व त्याचा मित्र रोहित मिटपल्लीवार (सातवा वर्ग), अनुराग मिटपल्लीवार (पाचवा वर्ग) हेसुध्दा तेथे आले. नहराच्या पायरीवर खेळत असताना राहुलचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी काजल, सुस्मिता, रोहित, अनुराग यांनी नहरात उडी घेतली. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते सर्वच पाण्यात वाहून जाऊ लागले. ते वाहत असताना नहराजवळ असलेल्या सुजाता संजय मिटपल्लीवार हिने आरडाओरड करून जवळपास असणार्‍या नागरिकांना बोलाविले असता संतोष राऊत व विशाल दुधे यांनी नहरात उडी टाकली. त्यांना चार मुलांना वाचविण्यात यश मिळवले. परंतु, काजल वाहून गेल्याने तिला जलसमाधी मिळाली. घटनेची माहिती सावली चे ठाणेदार आशिष बोरकर यांना देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य केले 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.