अमराई वार्डाचे पुनर्वसन करा
शिवसेना महिला आघाडी घेतली जिल्हा संघटीका सौ उज्वला प्रमोद नलगे यांची मागणी
घुग्घुस येथील अमराई वॉर्डात राहणारे गजानन मडावी यांचे घर शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास चक्क ७० फूट जमिनीत धसले. अचानक घडलेल्या या प्रकाराने परिसरात धास्ती निर्माण झाली आहे. याबाबत माहिती मिळताच शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे यांनी शिवसैनिकांसह पाहणी केली. chandrapur Landslide News |
ही घटना वेकोलीच्या खाणींमुळे घडत असल्याने याची चौकशी करून अमराई वार्डाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी तथा वेकोली महाप्रबंधक याच्याकडे आपण करणार असल्याची माहिती नलगे यांनी दिली.
काल सायंकाळी दरम्यान मडावी कुटुंब घरी असताना अचानक घराची भिंत कोसळली. त्यामुळे ते घराबाहेर निघाले आणि काही क्षणात त्यांचे घर जवळपास ७० फूट जमीन धसले. सुदैवाने त्यांचे कुटुंब थोडक्यात बचावले. सौ. नलगे यांनी मडावी कुटुंबीयांची भेट घेतली असता सौ. उमाताई मडावी यांना अश्रू अनावर झाले. सौ. नलगे यांनी त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.chandrapur Landslide News |
या ठिकाणी वेकोलिच्या जुन्या होत्या. त्यामुळे ही घटना घडली. या घटनेची चौकशी करून मडावी कुटुंबीयांना नुकसाभरपाई व अमराई वार्डाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी तथा वेकोली महाप्रबंधक याच्याकडे आपण करणार असल्याचे सौ. नलगे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख गणेशजी शेंडे, संजनाताई जगताप, शिवसेना शहर अध्यक्ष अंकूश सपाटे, शिवाजी नैताम, शहशाह जुबेर शेख, नान्हे ताई, शिवसैनिक भास्कर ठावरी व विविध महीला व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. chandrapur Landslide News |