महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात कॅम्पस मध्ये 20 पदवीधर विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार
गडचांदूर : महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदुर येथे कॅम्पस प्लेसमेंट आयोजन 20 ऑगस्ट ला करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेट सेल आणि स्टॉप कॅन्सर मल्टिपर्पज मिशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह राबविण्यात आला. स्टॉप कॅन्सर मल्टिपर्पज मिशन नागपूर हि एक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनाईझशन (NGO) असून सेवाभावीवृत्तीने संपूर्ण देशभर कार्य करते. कॅन्सर सारखा अति दुर्धर रोग संपूर्णपणे नष्ट व्हावा म्हणून वेगवेगळ्या महाविद्यालयात अश्या प्रकारचे कार्यक्रम राबवितात. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी महाविद्यालयात प्रबोधन व जॉब प्लेसमेंट चे नियोजन करण्यात आले आहे. या मिशन चे डेप्युटी डायरेक्टर मा. कमल गौतम , जिल्हा प्रभारी मा. अजय ठाकरे व मा . रोहित येडे तसेच मा. सचिन कांबळे व डिम्पल येडे या सहकार्यांनी महाविद्यालयात येऊन हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.महाविद्यालयातील पदवी प्राप्त झालेले तसेच परिसरातील इतर महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थी असे एकूण 60 विद्यार्थी या साठी मुलाखतीला हजर होते. 20 विद्यार्थ्यांना सेवाभावी संथेच्या विविध पदाकरीता निवडण्यात आले आहेत.महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जॉब प्लेसमेंट करिता हा पहिला प्रसंग नसला तरी एकावेळी एवढे विद्यार्थी जॉब साठी पात्र पहिल्यांदाच आले होते. कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह च्या उद्घाटन समारंभाला ला प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सौ स्मिता चिताडे यांनी आलेल्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य . रामकृष्ण पटले यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. डॉ अनिस खान यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमचे नियोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल चे अधिकारी प्रा. पवन चटारे यांनी केले तसेच प्रा. मनोहर बांद्रे व इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम केले.