Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट २४, २०२२

local crime News | 5 पिस्टल, 3 खाली मॅगझीन व 11 जिवंत काडतुसासह आरोपी सापडला





*गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरामध्ये मिळुन आला पिस्टल साठा , रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडुन तब्बल 5 पिस्टल 3 खाली मॅगझीन व 11 जिवंत काडतुसासह आरोपी गुन्हे शाखा युनिट -२ कडुन जेरबंद


गणेश उत्सवाच्या पार्श्वमाभुमीवर.पोलीस आयुक्त सो यांनी गुन्हेशाखे कडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांना महत्वाच्या सूचना दिल्या होत्या , त्या अनुषंगाने *पोलीस अंमलदार गजानन सोनुने व उज्वल मोकाशी* यांना बातमी मिळाली की परराज्यातून मोठ्या प्रमाणात पिस्टल विक्रीसाठी पुणे येथे येत असून त्यापैकी 1 पिस्टल इस नाम आकाश जाधव रा . भिलारेवाडी , काजण पुणे याचे ताब्यात आहे .अशी खात्रीशिर बातमी प्राप्त होताच यूनिट 2 प्रभारी श्री क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वैशाली भोसले , विशाल मोहिते , पो उप - नि राजेंद्र पाटोळे तसेच युनिट -२ कडील पोलीस अमलदार गजानन सोनुने , उज्ज्वल मोकाशी , कादीर शेख , संजय जाधव उत्तम तारू यांच्या मदतीने दिनांक 13/08/2022 रोजी यूनिट -2 हदीमध्ये स्वातंत्र दिन ऑपरेशन निमीत्त , प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना बातमीप्रमाणे आकाश प्रकाश जाधव वय २३ वर्षे , रा . मिलारेवाडी , कात्रज पुणे यास नटराजहॉटेल , स्वारगेट पुणे येथुन ताब्यात घेवून त्याचे अंगझडती मध्ये 55,200 / -रु चे 1 पिस्टल मॅगझीनसह, 1 खाली मॅगझीन एक जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याचे जवळ अग्निशत्र जवळ बाळगण्या बाबत कोणतेही परवाना नसल्याने त्याचे विरुध्द स्वारगेट पो स्टे गुरन 172/2022 आर्म अॅक्ट 3( 25 ) च महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 ( 1 ) ( 3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून दाखल गुन्हयाचा तपास वरीष्ठाच आदेशान्वये युनिकडील पोलीस उप - निरीक्षक राजेंद्र पाटोळे यांचेकडे दिल्याने आकाश प्रकाश जाधव पोलीस कस्टडी दरम्यान यातील पाहिजे मुख्य आरोपी नामे *मुजम्मील हरुण बागवान रा . वार्ड क्र .२ . श्रीरामपुर जिल्हा अहमदनगर* यास अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान पुणे येथील नातेवाईकाचे रहाते घरातुन व श्रीरामपुर येथील राहते घरातून पंचनाम्याने 4 पिस्टल मॅगझीनसह 2 खाली मॅगझीन , 10 जिवंत काडतुस व अगोदर जात केलेले 1 पिस्टल असे *सर्व मिळूण एकुण 2,47,200/ - रु किमतीचे 5 पिस्टल मॅगझीनसह 3 खाली मॅगझीन व 11 जिवंत काडतुस असे घातक अग्निशत्रे हस्तगत करण्यात यश आले आहे* . तपासामध्ये आणखी अवैध पिस्टल मिळुन येण्याची शक्यता असल्याने गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखे कडील पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र पाटोळे हे करीत आहेत .
*अटक आरोपी नामे मुजम्मील बागवान याचेवर खुन , अग्निशत्रे खरेदी विक्री करणे तसेच जवळ बाळगणे असे गुन्हे दाखल आहे*
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , पालीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , पोलीस उप - आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे , सहा पो आयुक्त , गुन्हे , श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक , क्रांतीकुमार पाटील , गुन्हे शाखा , युनिट -२ , पुणे शहर , सहा . पो . निरी , वैशाली भोसले , विशाल मोहित , पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पाटोळे , पोलीस अमलदार गजानन सोनुने , उज्ज्वल मोकाशी , कादीर शेख उत्तम तारु , संजय जाधव , समिर पटेल , साधना ताम्हाणे , रेश्मा उकरंडे , निखिल जाधव , मोहसिन शेख , गणेश थोरात , प्रमोद कोकणे , शंकर नेवसे , राहुल राजपुरे , नागनाथ राख , यांनी केली आहे




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.