Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १५, २०२२

जस्ट कीचन कंपनीमध्ये स्थानिक महिलांना कामावरून काढले |

चंद्रपुर-: जस्ट कीचन कंपनी (Just Kitchen )मध्ये स्थानिक महिलांना कामावरून काढून परप्रांतीयांना नोकरी दिल्यामुळे जिल्हा संघटिका उज्वला नलगे, वर्षा कोठेकर यांनी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलिस अधिक्षक यांना निवेदन दिले. 




चंद्रपूर एमआयडीसी (Chandrapur MIDC) येथे असलेल्या जस्ट किचन या कंपनी मध्ये स्थानिक महिला कामगार व मुले काम करीत होते . जवळपास ८० कर्मचारी या कंपनी मध्ये असून नागाळा चिंचाळा , वांढरी बुटाळा व लहुजीनगर येथील स्थानिक लोंकाचा रोजगार येथे असून कंपनीच्या वतीने कुठलीही कारण नसताना काही महिलांना कामावरून काढून टाकले व बेरोजगार केले . आज या महिलांचे परिवार या कामावर अवलंबून असून त्याच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आलेली आहे . कंपनीच्या वतीने वारंवार जसले प्रकारया अगोदर पण झालेले आहेत .


ले काही काळापासून स्थानिक लोंकाना काढून परप्रांतीय लोकाना कामावर ठेवणे हा प्रकार सुरु झालेला आहे . त्यामुळे स्थानिक कामगारावर अन्याय होत आहे याविरोधात महिला आघाडी पदाधिकारी म्हणून कित्येकदा कंपनीच्या स्थानिक कर्मचारी व ठेकेदाराची चर्चा केल्यानंतर त्यांनी महिलांना पूर्ववत कामावर घेण्यास उडवा उडवीची उत्तर देत असून नकार दिला कंपनीच्या व ठेकेदाराच्या या मुजोरीमुळे गरीब गरजू महिला व युवकावर अन्याय होत असून जर येत्या ७ दिवसात यावर सकारात्मक विचार करून सर्व काढलेल्या महिला युवकांना पूर्ववत न केल्यास या विरोधात शिवसेना जिल्हा महिला , युवक गावकरयासबोत उपोषण करण्यात येईल 

Local women workers and children were working in the Just Kitchen company at Chandrapur MIDC.

Local women workers 

children 

Just Kitchen company at Chandrapur MIDC.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.