Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १५, २०२२

वाघाच्या हल्ल्यात अलिझंजा येथील गुराखी ठार

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या अलिझंजा जंगलात वाघाने केलेल्या हल्ल्यात सीताराम नन्नावरे (Sitaram Nannaware ) ठार हा ठार झाला. ही घटना शुक्रवारी घडली. 


 ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत ( Tadoba Andhari Tiger Reserve) असलेल्या खडसिंगी गावाजवळ बाह्मणगाव, टेकेपार व अलिझंजा (Bahmangaon, Tekepar and Alijanja) या गावांना लागून जंगल असल्याने वाघाचा धुमाकूळ सुरू असतो. परंतु गावकऱ्यांना शेतामध्ये, जळावू लाकडे गोळा करण्यासाठी व गुरे चारण्यासाठी जंगलात जावे लागते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या अलिझंजा जंगलात वाघाने केलेल्या हल्ल्यात सीताराम नन्नावरे ठार हा गुराखी ठार झाला. 
अलिझंजा येथील सीताराम नन्नावरे ( वय  65 ) हा  किटाळी गावालगत असलेल्या हेटी शेत शिवार परिसरात  स्वतःच्या मालकीचे जनावर चारत होता. जनावरे चराई करीत  असताना हा विश्रामसाठी एका झाडाखाली बसला होता. त्याचवेळी वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. याची माहिती इतर गुरख्यानी गावात येऊन दिली. घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा केला आहे. मागील काही दिवसापासून वाघाचे दर्शन सामान्य माणसांना होत आहे.त्यात वाघाचे हल्ले होत असल्याने गावागावात दहशत पसरली आहे.
तळोधी नाईक किटाळी गावालगत असलेल्या हेटी शिवार परिसरात वाघ दबा घेऊन बसला होता त्यातच सीताराम नन्नावरे हा आपले बैल चारत होता तेवढ्यात वाघाने ननावरे यांच्यावर हल्ल्ला चढवला त्यात ननावरे ठार झाले. सदर हल्यात ननावरे यांच्या एका बैलाची सुद्धा केली शिकार तर दूसरा बैल जख्मी झाला





Sitaram Nannaware was killed in a tiger attack in the Alijanja forest under the Tadoba Andhari Tiger Reserve. This incident happened on Friday. The villages of Bahmangaon, Tekepar and Alijanja under the Tadoba Tiger Reserve are surrounded by forests and the tigers are on the prowl. But the villagers have to go to the fields, to collect firewood and to the forest to graze their cattle.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.