वाडी येथे मुख्याध्यापकांची शिक्षण विचार मंथन सभा
दिशा प्रकल्प, शिकू आनंदे, करू या मैत्री गणिताशी वर केले फोकस
"हर घर तिरंगा" साठी करणार जनजागृती
वाडी - पंचायत समिती नागपूर अंतर्गत जिप शाळा मुख्याध्यापकांची शिक्षण विचार मंथन सभा उच्च प्राथमिक शाळा वाडी येथे केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी शरद भांडारकर यांचे प्रमुख उपस्थितीत सम्पन्न झाली.
सदर सभेत झिरो ड्रॉप आउट मिशन सर्वे तसेच शिष्यवृत्ती परीक्षा सराव वर्ग, समाजकल्याण व सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती साठी प्रस्ताव - संभाव्य संख्या निश्चित करणे, सन 2021-22 उपस्थिती भत्ता वाटप, समाजकल्याण व सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती, शाळेचे वार्षिक नियोजन, सखी सावित्री समिती, शिक्षण सेवा हमी कायदा, शालेय पोषण आहार समिती, माता पालक गट, शाळा व्यवस्थापन समिती, अधिकारी -पदाधिकारी माहिती तक्ते, समग्र शिक्षा गणवेश अनुदान उपयोगिता, विद्या प्रवेश, सेतु अभ्यास, रीड टू मी एप, निपुण भारत अभियान, दिशा प्रकल्प, हर घर तिरंगा, शाळा स्तरावरील नावीन्यपूर्ण उपक्रम, शालेय पोषण आहार योजना अंकेक्षण बाबत तयारी,
वृक्षारोपण आढावा, कब बुलबुल स्काउट गाइड नोंदणी शिबीर, आजादी का अमृत महोत्सव नियोजन व कार्यवाही,
शिक्षण परिषद मासिक नियोजन ईत्यादी विषयावर शाळांचा आढावा घेवून चर्चा करण्यात आली.
यावेळी केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी भविष्य वेधी शिक्षण प्रणाली व मल्टी टास्किंग स्किलचा वापर करून शैक्षणिक समस्या कशाप्रकारे सोडवाव्यात याबाबत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
सभेत 16 शाळांपैकी 15 शाळेचे मुख्याध्यापक रजनी चौधरी, संजय नागरे, दीपचंद पेनकांडे, रामेश्वर थोटे, उत्तम मेश्राम, मोहिनी वैरागडे, प्रियदर्शनी मौदेकर, शोभा उमरेडकर, अनिता पाटील, मनीषा चौधरी, वैशाली रेवतकर, माधुरी घोडमारे, सुधीर बाराहाते, मालती वंजारी, ईत्यादी उपस्थित होते.
सभेचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन युवराज उमरेडकर यांनी पार पाडले.Education Brainstorming Meeting of Principals at Wadi