स्थिर खाण व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रातील अल्ट्राटेक खाणींचा पंचतारांकित रेटिंगसह सन्मान
वैज्ञानिक, कार्यक्षम व स्थिर खाणकाम, मान्यताकृत उत्पादनाचे अनुपालन, जमिन, पुनर्वसन आणि इतर सामाजिक परिणाम अशा घटकांवर सर्वोत्तम कामगिरी करणा-या खाणींना पंचतारांकित रेटिंग दिले जाते
चंद्रपूर : जुलै २०२२: खाण मंत्रालय व भारतीय खाण ब्युरो यांनी स्थिर खाण व्यवस्थापनासाठी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या दहा चुनखडीच्या खाणींना पंचतारांकिंत रेटिंगसह सन्मानित केले आहे, ज्यापैकी २ खाणी अवरपूर सिमेंट वर्क्स आणि माणिकगड सिमेंट वर्क्स महाराष्ट्रामध्ये आहेत. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी एकूण दहा पंचतारांकित रेटिंग पुरस्कारांसह सन्मानित करण्यात आले. अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड भारतातील आघाडीची सिमेंट व रेडी-मिक्स-कॉंक्रीट कंपनी आहे.
नवी दिल्लीमध्ये १२ जुलै २०२२ रोजी ६व्या नॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन माइन्स अॅण्ड मिनरल्स (एनसीएमएल) येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारोहामध्ये अल्ट्राटेकला सन्मानित करण्यात आले. माननीय केंद्रीय संसदीय कार्य, कोळसा व खाण मंत्री श्री. प्रल्हाद जोशी आणि माननीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते पंचतारांकित प्रमाणपत्रे व ट्रॉफीज देण्यात आले. पुरस्कार-प्राप्त युनिट्समधील संबंधित प्रतिनिधींना श्री. जोशी, श्री. दानवे आणि सरकारच्या इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले.
खाण मंत्रालायाची संकल्पना असलेले स्टार रेटिंग्स खाणकामामध्ये स्थिर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वोत्तम पद्धतींच्या अवलंबतेवर आधारित आहेत. या रेटिंग योजनेमधील सर्वोच्च पंचतारांकित रेटिंग वैज्ञानिक, कार्यक्षम व स्थिर खाणकाम, मान्यताकृत उत्पादनाचे अनुपालन, जमिन, पुनर्वसन आणि इतर सामाजिक परिणाम अशा घटकांवर आधारित सर्वोत्तम कामगिरी करणा-या खाणींना दिले जाते.
समारोहामध्ये सन्मानित करण्यात आलेल्या अल्ट्राटेकच्या खाणींची यादी पुढीलप्रमाणे:
२०१६ मध्ये खाण मंत्रालयाने केंद्र व राज्य सरकार अधिकारी, उद्योग कार्यकारी व उद्योग संघटना अशा विविध भागधारकांमध्ये परस्परसंवाद होण्याकरिता व्यासपीठ देण्याच्या उद्देशासह नॅशनल मायनिंग कॉन्क्लेव्ह (राष्ट्रीय खाण परिषद) सुरू केली. कॉन्क्लेव्ह केंद्राने हाती घेतलेल्या प्रमुख धोरणात्मक उपक्रमांना दाखवते आणि खाण क्षेत्राची स्थिर वाढ सक्षम करण्याच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी बहुमूल्य अभिप्राय मिळविण्यात सरकारला मदत करते.
Ultratech mines honored with a five-star rating