Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै ०५, २०२२

बापरे !! दारू दुकान स्थलांतरणासाठी १८ ते २० कोटींची देवाण-घेवाण

पप्पू देशमुख यांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप :


 

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांसह अनेक अधिकाऱ्यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार 


चंद्रपूर : मे २०२१ मध्ये राज्य शासनाने दारूबंदी हटविल्यापासून दारू दुकान स्थलांतरण किंवा नवीन दुकानाला मंजुरी देताना अधिकाऱ्यांनी अनेक नियम डावलले. त्याकरिता १८ ते २० कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाल्याची दाट शक्यता असल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची तक्रार पुराव्यासह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर केले असल्याचे त्यांनी सांगीतले. 

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक मारुती पाटील, दुय्यम निरीक्षक अमित शिरसागर यापूर्वीचे अधीक्षक सागर ढोमकर, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, तालुका भूमिलेखचे उपाधीक्षक मिलिंद राऊत यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या नावाचा तक्रारीत समावेश आहे.  


District Collector Ajay Gulhane, Superintendent of Police Arvind Salve, State Excise Superintendent Sanjay Patil, Inspector Maruti Patil, Deputy Inspector Amit Shirsagar, former Superintendent Sagar Dhomkar, Municipal Commissioner Rajesh Mohite, Taluka Bhumilekh Deputy Superintendent Milind Raut and other police inspectors of various police stations in the district.


 नागपूर रोडवरील महालक्ष्मी टाॅवरमध्ये डॉ. राम भारत यांच्या बालरुग्णालयाला लागून, श्रीकृष्ण टॉकीज जवळील केडी कॉम्प्लेक्स व दाताळा रोडवरील निवासी इमारतींमध्ये देशी दारू दुकानाला देण्यात आलेल्या मंजुरीचे वाद शमण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाही. दारु दुकानाचे स्थालांतरण व नवीन दुकानाला परवानगी देताना वरिल संबंधित अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून मोठा भ्रष्टाचार केला. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांसह सर्व अधिकाऱ्यांच्या जवळचे नातेवाईक व मित्र यांच्या संपत्तीची चौकशी करावी, त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटची चौकशी करावी, अशी मागणी देशमुख यांनी एसीबीकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.   



Anti Corruption Bureau



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.