Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै ०५, २०२२

आमदार जोरगेवार यांनी नाकारली वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा |


राज्यात राजकीय पेच निर्माण झाल्याने ५० विधानसभा सदस्यांना सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून वाय प्लस ( Y + ) दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली. त्याअनुषंगाने चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थान “ राजमाता " निवास , कोतवाली वार्ड , चंद्रपूर व जनसंपर्क कार्यालय , जैन भवन जवळ , पठाणपुरा रोड चंद्रपूर येथे अतिरिक्त पोलीस यंत्रणा कार्यान्वित करून सुरक्षेकरिता सशस्त्र पोलीस शिपायांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, आता राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले असून, सर्वत्र कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे. त्यामुळे पुरविण्यात आलेली वाय प्लस (Y +) दर्जाची सुरक्षा कमी करण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली आहे. 



Y सिक्युरिटी म्हणजे काय ? 




यामध्ये एकूण ११ जवानांची सुरक्षा प्राप्त होते, ज्यामध्ये एक किंवा दोन कमांडोज असतात. तसेच दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स पण सोबत असतात. व्यक्ती सोबत असणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाकडे ९ एमएम ची पिस्तुल तर एकाकडे स्टेन गन असते. यामध्ये एका सशस्त्र जवानाची सुरक्षा त्या व्यक्तीच्या घराला दिली जाते.


Kishor Gajanan Jorgewar (born 17 December 1968 ) is an Indian politician. He was elected to the Maharashtra Legislative Assembly from Chandrapur in the 2019 ... kishor jorgewar. MLA of Chandrapur Assembly Constituency & President of young chanda brigade,Chandrapur.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.